advertisement

Central Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शनिवारी- रविवारी महत्वाच्या कामासाठी मेगा ब्लॉकची घोषणा, असं असेल वेळापत्रक?

Last Updated:

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक मध्य रेल्वेकडून घोषित करण्यात आला आह. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

central railway special traffic and Power block for launching of FOB girders at kanjurmarg railway station see here all updates
central railway special traffic and Power block for launching of FOB girders at kanjurmarg railway station see here all updates
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक मध्य रेल्वेकडून घोषित करण्यात आला आह. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रविवारच्या दिवशी अनेक नोकरदार वर्गाला ऑफिसेससाठी सुट्टी असते. त्यामुळे रेल्वेकडून रविवारच्या दिवशी महत्त्वाच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जातो.
मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घरातून निघण्याआधी वेळापत्रक तपासूनच घराच्या बाहेर पडायचे आहे. मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वेच्या फ्लाय ओव्हर ब्रिजच्या गर्डर लाँचिगसाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या पॉवरब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रेल्वे प्रवाशांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावरील कल्याण स्थानकाच्या दिशेकडील फ्लाय ओव्हर ब्रिजचे काम हाती घेतले आहे.
advertisement
कि.मी. 24/ 13- 14 दरम्यान पादचारी उड्डाणपूलासाठी 6 मीटर रुंदीचे 4 गर्डर, रोड क्रेनच्या सहाय्याने लाँच करण्यात येणार आहे. यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून शनिवारी 14 फेब्रुवारी आणि रविवार 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा मुंबई उपनगरीय लोकलवरही परिणाम होणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे लोकल 15 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मध्यरात्री 12.24 मिनिटांनी सुटणारी लोकल आणि ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल 15 फेब्रुवारी रोजी ठाणे येथून पहाटे 04.04 वाजता सुटणारी लोकलही रद्द करण्यात आली आहे.
advertisement
तर, मध्य रेल्वेवरील इतर उपनगरीय रेल्वेबद्दल सांगायचे तर, मेगाब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत लोकल 15 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी मध्यरात्रीची 12.12 वाजताची लोकल माटुंगा रेल्वे स्थानक ते मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान डाउन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे. तर, लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या रेल्वे स्थानकांवर थांबणार नाही. त्यामुळे या तिन्ही स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना आपल्या सोयीप्रमाणे असणाऱ्या रेल्वे स्थानकावर उतरायचे आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शनिवारी- रविवारी महत्वाच्या कामासाठी मेगा ब्लॉकची घोषणा, असं असेल वेळापत्रक?
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement