कोणीच सांगू शकत नाही पुढे काय होणार, खड्डे पाहून नासाचे शास्त्रज्ञ घाबरले; फुटबॉल अन् क्रिकेटचे मैदानही लहान

Last Updated:

Massive Sinkholes: तुर्कस्तानमध्ये अचानक तयार झालेल्या प्रचंड गड्ढ्यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. फुटबॉल-क्रिकेट मैदानांपेक्षाही मोठे असलेले हे खड्डे पाहून नासाचे शास्त्रज्ञही चिंतेत पडले आहेत.

News18
News18
अंकारा: पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेला तुर्कस्तान सध्या एका मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. ज्यामुळे शास्त्रज्ञही चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियावर तुर्किएमधील अनेक धक्कादायक फोटो समोर आले असून, त्यामध्ये अतिशय मोठे खड्डे (सिंकहोल्स) दिसत आहेत. हे खड्ढे इतके प्रचंड आहेत की फुटबॉल किंवा क्रिकेटचे मैदानही त्यांच्यासमोर लहान वाटावे. विशेष म्हणजे ही संख्या एक-दोन नसून शेकडो खड्डे तयार झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार तुर्कस्तानतील विविध भागांत आतापर्यंत सुमारे 700 असे खड्डे आढळून आले आहेत.
advertisement
तुर्कस्तानच्या मध्य भागातील कोन्या प्लेन या परिसरात या खड्डयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने भीतीच वातावरण निर्माण झाल आहे. स्थानिक लोक या खड्ड्यांना ओब्रुक’ असे म्हणतात. हे असे सिंकहोल्स आहेत जे शेती, रस्ते आणि वस्त्यांनाही गिळंकृत करत आहेत. डिसेंबर 2025 मधील अहवालानुसार कोन्या, करमान आणि अक्साराय या भागांत आतापर्यंत सुमारे 700 ओब्रुक नोंदवले गेले आहेत. त्यापैकी एकट्या करापिनार जिल्ह्यातच सुमारे 534 खड्डे आहेत. कोन्या प्रदेशाला तुर्कस्तानचे ‘धान्य कोठार’ मानले जाते. येथे देशातील 36 टक्के गहू आणि 35 टक्के साखरबीट उत्पादन होते. मात्र आता या भागातील शेतकरी भीतीच्या छायेखाली जगत आहेत.
advertisement
ज्या शेतांत कधीकाळी ट्रॅक्टर चालवले जात होते, तिथे आता जमीन कधीही खचेल की काय, अशी भीती सतत सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांना आपली शेती सोडावी लागली आहे, तर काही ठिकाणी एका शेतात दोन-दोन ओब्रुक तयार झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण होण्यामागे दीर्घकाळ चाललेला दुष्काळ आणि भूजलाची झपाट्याने घसरलेली पातळी ही मुख्य कारणे आहेत.
advertisement












View this post on Instagram























A post shared by AccuWeather (@accuweather)



advertisement
कोन्या प्लेन हा कार्स्ट भूभाग आहे, म्हणजेच या भागात जमिनीखाली चुनखडीच्या (लाइमस्टोन) थरांचे प्रमाण जास्त आहे. हे थर पाण्यात सहज विरघळतात. जेव्हा भूजलाची पातळी खूप खाली जाते, तेव्हा वरची माती आधार गमावते आणि अचानक कोसळते, त्यामुळे जमिनीत हे प्रचंड खड्डे तयार होतात.
advertisement
नासानेही या धोक्याबाबत इशारा दिला आहे. नासाच्या अहवालानुसार, 2021 मध्ये या भागातील जलसाठे गेल्या 15 वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर होते. हजारो वैध आणि अवैध बोरवेलमधून सातत्याने पाणी उपसल्यामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यातच पावसाचे प्रमाण कमी असल्याने संकट अधिकच गडद झाले आहे.
advertisement
2000 नंतर ही समस्या हळूहळू दिसू लागली होती, पण आता तिने भयानक स्वरूप धारण केले आहे. ऑगस्ट 2025 मध्ये करमान प्रांतातील एका दुर्गम गावात 15 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल खड्डा तयार झाला होता. त्यानंतरच्या महिन्यात करापिनार भागात 40 मीटर खोल ‘इनुओबा ओब्रुक’ आढळून आला. सध्या शास्त्रज्ञ या खड्ड्यांवर लक्ष ठेवून असून, धोका नकाशा (Risk Map) तयार केला जात आहे. जेणेकरून भविष्यात वस्त्या आणि रस्त्यांचे नुकसान टाळता येईल.
view comments
मराठी बातम्या/science/
कोणीच सांगू शकत नाही पुढे काय होणार, खड्डे पाहून नासाचे शास्त्रज्ञ घाबरले; फुटबॉल अन् क्रिकेटचे मैदानही लहान
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement