IND vs SA : एकट्याच्या जीवावर वर्ल्ड कप जिंकणार? अभिषेकच्या मागे लपले टीम इंडियाचे 5 बॅट्समन!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटनी दणदणीत विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 118 रनचं आव्हान भारताने 15.5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं.

एकट्याच्या जीवावर वर्ल्ड कप जिंकणार? अभिषेकच्या मागे लपले टीम इंडियाचे 5 बॅट्समन!
एकट्याच्या जीवावर वर्ल्ड कप जिंकणार? अभिषेकच्या मागे लपले टीम इंडियाचे 5 बॅट्समन!
धर्मशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटनी दणदणीत विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 118 रनचं आव्हान भारताने 15.5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं आणि सीरिजमध्ये 2-1 ची आघाडी घेतली, पण या विजयानंतरही टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियासमोरच्या प्रश्नांची उत्तर काही मिळाली नाहीत. अभिषेक शर्माने नेहमीप्रमाणे टीम इंडियाला वादळी सुरूवात करून दिली. इनिंगच्या पहिल्याच बॉलला सिक्स मारून अभिषेकने दक्षिण आफ्रिकेवर आक्रमण करायला सुरूवात केली.
अभिषेक शर्माने 18 बॉलमध्ये 194.44 च्या स्ट्राईक रेटने 35 रन केले, ज्यात 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता, पण अभिषेक आऊट झाल्यानंतर टीम इंडियाचा खेळ सावध झाला. शुभमन गिलने 28 बॉलमध्ये 28 तर सूर्यकुमार यादवने 11 बॉलमध्ये 12 रन केले. मागच्या काळापासून शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव संर्घष करत आहेत. सूर्यकुमार यादवचं मागच्या 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक आहे, तर गिलला 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आलेलं नाही.
advertisement
तर जितेश शर्मा, शिवम दुबे आणि अक्षर पटेल या खेळाडूंनाही मागच्या काही सामन्यांमध्ये धमाकेदार खेळी करता आलेली नाही. या सामन्यात अक्षर पटेल तब्येत बरी नसल्यामुळे खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही टी-20 सीरिजमध्ये अभिषेक शर्माच्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियाने सीरिज जिंकली आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आघाडी घेतली, पण अभिषेक शर्माच्या बॅटिंगच्या जोरावर टीममधल्या गिल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांची कामगिरी लपत आहे.
advertisement
भारतामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 5 अशा एकूण 7 मॅच आहेत. या 7 सामन्यांमध्ये भारतीय बॅटिंगला सूर सापडणं गरेजचं आहे, अन्यथा टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : एकट्याच्या जीवावर वर्ल्ड कप जिंकणार? अभिषेकच्या मागे लपले टीम इंडियाचे 5 बॅट्समन!
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement