IND vs SA : 23 बॉल खेळून फक्त 5 रन... भारताच्या सुपरस्टारची स्वार्थी बॅटिंग, टीम इंडियात का ठेवायचं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 118 रनचं आव्हान भारताने 15.5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं.
धर्मशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 118 रनचं आव्हान भारताने 15.5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्माने 18 बॉलमध्ये 35 रनची खेळी करून टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली. अभिषेकच्या या खेळीमध्ये त्याने 3 फोर आणि 3 सिक्स मारल्या. याशिवाय गिलने 28, तिलक वर्माने नाबाद 25, सूर्यकुमार यादवने 12 आणि शिवम दुबेने नाबाद 10 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को यानसन आणि कॉर्बिन बॉश यांना एक-एक विकेट मिळाली.
सुपरस्टारची स्वार्थी बॅटिंग
मागच्या सामन्यात पहिल्याच बॉलला शून्यवर आऊट झालेल्या शुभमन गिलने या सामन्यात 28 रनची खेळी केली, पण यासाठी त्याने तब्बल 28 बॉल खेळले. 28 रनच्या या खेळीमध्ये गिलने 5 फोर मारल्या, म्हणजेच उरलेल्या 8 रन काढण्यासाठी गिलने 23 बॉल खर्च केले. मागच्या 18 इनिंगमध्ये शुभमन गिलला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकही करता आलेलं नाही, त्यामुळे त्याचं टीम इंडियातलं स्थान धोक्यात आलं आहे.
advertisement
गिलला वारंवार संधी मिळत असल्यामुळे संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागत आहे, तर यशस्वी जयस्वालही टीमबाहेर आहे, त्यामुळे शुभमन गिलने स्वत:चं टीममधलं स्थान वाचवण्यासाठी एवढी संथ खेळी केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी टीम इंडियाच्या आता फक्त 7 टी-20 मॅच उरल्या आहेत, त्यामुळे गिलचं फॉर्ममध्ये येणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे.
advertisement
बॉलिंगमध्ये टीम इंडियाचा धमाका
मागच्या सामन्यात 200 पेक्षा जास्त रन दिल्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. बुमराहच्या गैरहजेरीमध्येही भारताने दक्षिण आफ्रिकेला 117 रनवर ऑलआऊट केलं. अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने सर्वाधिक 61 रन केले. 4 ओव्हरमध्ये फक्त 13 रन देऊन 2 विकेट घेणाऱ्या अर्शदीप सिंगला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
view commentsLocation :
Himachal Pradesh
First Published :
December 14, 2025 11:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 23 बॉल खेळून फक्त 5 रन... भारताच्या सुपरस्टारची स्वार्थी बॅटिंग, टीम इंडियात का ठेवायचं?









