चित्यासारखा धावला, दहशतवाद्याला एकट्याने लोळवले; कोण आहे अहमद अल-अहमद? जगाने ठोकला सलाम

Last Updated:
Sydney Bondi Beach Shooter: बॉन्डी बीचवरील भीषण गोळीबारात मृत्यू समोर असतानाही एका निशस्त्र नागरिकाने दहशतवाद्याकडे धाव घेत त्याच्याकडील राइफल हिसकावली. या धाडसी कृतीमुळे अनेक निष्पाप लोकांचे प्राण वाचले आणि तो माणूस जगभरासाठी खरा हिरो ठरला.
1/7
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बॉन्डी बीच येथे रविवारी ज्यू सणाच्या उत्सवावेळी मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला. आनंदाच्या क्षणात अचानक गोळ्यांचा आवाज घुमू लागला आणि काही क्षणांतच हा परिसर रक्तरंजित झाला. या भीषण गोळीबारात 12 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. मात्र या भयावह दृश्यांमधून एक अशी घटना समोर आली, जिने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. निशस्त्र अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने मृत्यूला थेट सामोरे जात, हातात बंदूक असलेल्या दहशतवाद्याला पकडून जमिनीवर पाडले. आता या व्यक्तीला जगभरातून “हीरो” म्हणून गौरवले जात आहे.

advertisement
2/7
ही धाडसी व्यक्ती म्हणजे अहमद अल-अहमद. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार 43 वर्षीय अहमद हे दोन मुलांचे वडील आहेत. ते सिडनीत फळांची छोटी दुकान चालवतात. गोळीबाराच्या गोंधळात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दहशतवाद्याकडे धाव घेतली. याच दरम्यान दुसऱ्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला आणि अहमद यांना दोन गोळ्या लागल्या. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि धोका टळला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

3/7
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या थरकाप उडवणाऱ्या व्हिडिओमध्ये एक पार्किंग परिसर दिसतो. त्या व्हिडिओत पांढऱ्या शर्टमधील एक सामान्य व्यक्ती, काळ्या कपड्यांत राइफल हातात घेऊन उभ्या असलेल्या दहशतवाद्याकडे धाव घेताना स्पष्ट दिसते. काही सेकंदांतच तो व्यक्ती चित्यासारख्या वेगाने मागून झडप घालतो आणि नुसत्या हातांनी दहशतवाद्याकडील राइफल हिसकावून घेतो. इतक्यावरच न थांबता, तोच बंदूक पुन्हा त्या दहशतवाद्याकडे रोखतो. ही दृश्ये पाहून अनेकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले आहेत.

4/7
व्हिडिओच्या पुढील भागात शस्त्र गमावल्यानंतर तो दहशतवादी डगमगत मागे हटताना दिसतो आणि एका पुलाकडे पळून जातो, जिथे आणखी एक हल्लेखोर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान तो धाडसी नागरिक परिस्थिती नियंत्रणात आणत बंदूक जमिनीवर ठेवतो. रॉयटर्सने या व्हिडिओची सत्यता तपासून ती खरी असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यानंतर झालेल्या चकमकीत एक संशयित हल्लेखोर ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत आहे. यामध्ये तिसरा हल्लेखोर सहभागी होता का, याचाही तपास सुरू आहे.

5/7
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, या नायकाच्या धैर्याची जगभर चर्चा सुरू आहे. अनेकांचे म्हणणे आहे की जर या व्यक्तीने त्या क्षणी धाडस दाखवले नसते, तर मृतांचा आकडा आणखी वाढला असता. एक्स वर एका युजरने लिहिले, “ऑस्ट्रेलियन हिरोने हल्लेखोराशी झुंज देत त्याला निशस्त्र केले. काही लोक धाडसी असतात आणि मग असे काही असतात… हा माणूस अद्भुत आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “या ऑस्ट्रेलियन व्यक्तीने बॉन्डी बीचवर एका दहशतवाद्याकडून बंदूक हिसकावून असंख्य जीव वाचवले. खरा हिरो.”

6/7
या घटनेवर राजकीय नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. न्यू साउथ वेल्सचे मुख्यमंत्री क्रिस मिन्स यांनी या दृश्याला “आपण पाहिलेल्या सर्वांत अविश्वसनीय घटनांपैकी एक” असे संबोधले. ते म्हणाले, “ज्या व्यक्तीने समुदायावर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याकडे धाव घेतली, त्याला एकट्याने निशस्त्र केले आणि इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, तो खरा हिरो आहे. आज रात्री अनेक लोक जिवंत आहेत, ते केवळ त्याच्या धैर्यामुळे.”

7/7
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांनीही या धाडसी कृतीचे कौतुक केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “जे ऑस्ट्रेलियन इतरांना मदत करण्यासाठी धोका असलेल्या दिशेने धाव घेतात, तेच खरे नायक आहेत. त्यांच्या धैर्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.”

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement