advertisement

Shocking Incident : आजारी आई-वडिलांच्या संरक्षणासाठी ठेवलं, तोच निघाला भक्षक; मुलुंडमधील केअरटेकरने केलं भयानक कृत्य

Last Updated:

Mumbai Shocking Crime : जर तुम्हीही आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी घरात केअरटेकर ठेवत असातल तर सावधान राहा. मुंबईतून सध्या एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे.

News18
News18
मुंबई : आई-वडिलांच्या आरोग्याची आणि दैनंदिन देखभालीची जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक कुटुंबे घरी केअरटेकर नेमतात. मात्र काही वेळा हाच विश्वासघात ठरतो आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडतात. मुंबई शहरातूनही अलिकडेच एक धक्कादायक प्रकरण समोर आलेले आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये राहणारे अभिषेक शर्मा यांच्या 78 वर्षीय वडिलांना गेल्या वर्षी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी सुनील चेतराम चौधरी (वय 44) याला 25 नोव्हेंबरपासून कामावर ठेवण्यात आले. तक्रारीनुसार,घरातील कपाटात ठेवलेली 16 सोन्याची नाणी आणि 4 तोळ्यांचे ब्रेसलेट 19 फेब्रुवारी रोजी तपासणीदरम्यान गायब आढळले. या दागिन्यांची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.
advertisement
संशय टाळण्यासाठी नवा डाव
सुनील चौधरी 4 फेब्रुवारी रोजी पत्नी आजारी असल्याचे सांगून जबलपूरला गेला होता. त्याने जाण्यापूर्वी आपले सामान तपासण्यासही सांगितले होते. मात्र दागिने गायब झाल्यानंतर संपर्क साधला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संशय त्याच्यावरच आला. घरात या काळात इतर कोणीही बाहेरची व्यक्ती आली नव्हती असे तक्रारीतही सांगण्यात आलेले आहे.
advertisement
पुन्हा तोच प्रकार
याआधीही मुंबईत अशा घटना घडल्या आहेत. ज्यात 2021 मध्ये जुहूमध्ये एका केअरटेकरने एनआरआय मालकाचा 100 कोटींचा बंगला कमी किमतीत विकल्याचा प्रकार उघड झाला होता. तसेच सांताक्रूझमध्ये 2023 मध्ये एका 85 वर्षीय डॉक्टरची केअरटेकरकडून हत्या करण्यात आली होती.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : आजारी आई-वडिलांच्या संरक्षणासाठी ठेवलं, तोच निघाला भक्षक; मुलुंडमधील केअरटेकरने केलं भयानक कृत्य
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement