Methi Recipe Video : न शिजवता बनते ही भाजी, आवडीने खातात लोक; रेसिपी पाहूनच अनेकांच्या तोंडाला सुटलं पाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
How to Make Methi Recipe Video : न शिजवता खाता येते अशा भाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही भाजी दुसरी तिसरी कोणती नाही तर मेथी आहे. काय? नाव वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.
कोणतीही भाजी म्हणा ती आपण शिजवून खातो. पण तुम्हाला एखादी भाजी न शिजवता बनवता येते असं सांगितलं तर... साहजिकच तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशी भाजीपण आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर आहे हो. एक अशी भाजी जी न शिजवता तुम्ही बनवून खाऊ शकता. आता ती भाजी कोणती ते पाहुयात.
न शिजवता खाता येते अशा भाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही भाजी दुसरी तिसरी कोणती नाही तर मेथी आहे. काय? नाव वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मेथी ही पालेभाजी जी थोडी कडवटही असते. शिजवल्यावर अनेकांना ती कडू लागते म्हणून ते खात नाहीत. अशीच भाजी आता न शिजवता कशी खायची? असं तुम्ही म्हणाल.
advertisement
तुम्हाला विश्वास बसणार नाही. या भाजीचा व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर ज्या कमेंट आल्या आहेत, त्यात लोकांनी ही अशा पद्धतीने मेथीची भाजी आपल्याला खूप आवडत असल्याचं सांगितलं आहे. आता नेमकी ही भाजी बनवायची कशी ते पाहुयात.
मेथी स्वच्छ धुवून त्याची पानं काढून घ्या. त्यात कांदा, टोमॅटो, कांद्याची पात, कोथिंबीर बारीक चिरून टाका. आता यात तुरीचे दाणे, शेंगदाण्याचा कूट, मीठ, मसाला, तेल टाका. शेवटी लिंबू रस टाकून हातांनीच मिक्स करून घ्या. आता खायला तयार आहे ही भाजी.
advertisement
advertisement
या रेसिपीचं नाव आहे मेथीचा घोळाणा किंवा मेथीचं घोळणं, @swadmarathicha इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा पदार्थ विदर्भातील आहे.
व्हिडीओच्या कमेंटमध्ये विदर्भातील अनेक लोकांनी हे खूप छान लागत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेही तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 9:21 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Methi Recipe Video : न शिजवता बनते ही भाजी, आवडीने खातात लोक; रेसिपी पाहूनच अनेकांच्या तोंडाला सुटलं पाणी










