Butter Recipe Video : बाजारात मिळणारं बटर घरीच कसं बनवायचं? शेफने दाखवली रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Homemade Butter Recipe Video : बाजारात मिळणारं हे बटर कसं तयार केलं जातं माहिती आहे का? खरंतर हे बटर तुम्ही घरीही बनवू शकता. एका शेफने बटर बनवण्याची रेसिपी दाखवली आहे.
ब्रेड बटर हा कित्येक घरातील नाश्ता आहे. काही आई आपल्या मुलांना शाळेच्या डब्यातही ब्रेड बटर देतात. पाव भाजी, डोसा असे काही पदार्थ ज्यांची चव बटरमुळेच अधिक वाढते. बाजारात मिळणारं हे बटर कसं तयार केलं जातं माहिती आहे का? खरंतर हे बटर तुम्ही घरीही बनवू शकता. एका शेफने बटर बनवण्याची रेसिपी दाखवली आहे.
बहुतेक लोक तूप घरी बनवतात पण बटरही घरी बनवता येतो हे अनेकांना माहिती नसेल. बटर वापरताना हे घरी हे कसं बनवतात, कसं बनवायचं, असा प्रश्नही काही लोकांना पडला असेल. बटर हे तुपापासूनच बनवलं जातं. त्यामुळे तुम्हाला यासाठी तूप लागेल आणि त्याचं बटर करण्यासाठी बर्फ. आता बटर कसं बनवायचं त्याची कृती पाहुयात.
advertisement
300 ग्रॅम तूप घ्या. त्यात 5-6 आइस क्युब म्हणजे बर्फाचे तुकडे टाका. 4-5 मिनिटं फेटून घ्या. हळूहळू तूप घट्ट होताना दिसेल. आता यात थोडीशी हळद टाकून पुन्हा 3-4 मिनिटं फेटून घ्या. आता यातील बर्फाचे तुकडे काढून टाका. तुम्ही पाहाल बटर तयार झालं आहे. एका डब्यात काढून घ्या.
advertisement
शेफने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शेवटी त्याने ब्रेडला हे बटर लावून दाखवलं आहे, जे अगदी बाजारात मिळणाऱ्या बटरसारखंच वाटतं आहे.
किती सोपं आहे ना? तुम्ही कधी घरी बटर बनवलं होतं का? तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का? नाहीतर हे बटर घरी बनवून पाहा आणि कसं झालं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 9:07 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Butter Recipe Video : बाजारात मिळणारं बटर घरीच कसं बनवायचं? शेफने दाखवली रेसिपी









