Pithala Bhat : पिठलं आणि भात वेगवेगळं बनवायची गरजच नाही; भातावरचं पिठलं, हटके रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bhatavarcha Pithala Recipe Video : खरंतर तुम्ही भात आणि पिठलं एकत्र बनवू शकता. सोशल मीडियावर भातावरच्या पिठल्याच्या रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
हुडहुडती थंडी आणि त्यात गरमागरम पिठलं-भाकरी किंवा पिठलं भात खाण्याची मजा काही औरच. पण पिठलं भात बनवायचं म्हटलं की भात वेगळा आणि पिठलं वेगळं बनवायला लागतं. दोन वेगवेगळे पदार्थ बनवण्यापेक्षा एकच किंवा एकत्रच बनवता आलं तर... हे शक्य आहे का? तर हो हे शक्य आहे. तुम्ही पिठलं भात नेहमी खाता आता उलटं करून बघा ते म्हणजे भातावरचं पिठलं.
तुम्ही सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ पाहिले असतील ज्यात लोक डाळ-भात एकत्र बनवतात. कुकरमध्ये खालील डाळ फोडणीला घातली जाते आणि त्यावर भांड्यात भात लावतात. पण पिठलं भात असं शक्य नाही. पण खरंतर तुम्ही भात आणि पिठलं एकत्र बनवू शकता. सोशल मीडियावर भातावरच्या पिठल्याच्या रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
advertisement
आता भातावरचं पिठलं कसं बनवायचं ते पाहुयात. सगळ्यात आधी तुम्हाला जितका भात करायचा आहे, तितके तांदूळ चांगले धुवून भिजवून घ्या. आता गॅसवर पातेलं ठेवून त्यात तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी घेऊन तांदूळ, मीठ आणि थोडं तेल टाकून भात शिजायला ठेवा.
आता एका वाटीत दही बेसन, मीठ, हळद, तेल, हिंग पाणी टाकून मिश्रण बनवून घ्या. भात अर्धा शिजला की त्यात हे दही-बेसनचं मिश्रण वर ओता आणि भाताच्या भांड्यावर झाकण ठेवून घ्या.
advertisement
तोपर्यंत आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कडीपत्ता आणि लसूण टाका. ही फोडणी भातावर टाकलेल्या पिठल्यावर ओता. थोडा वेळ झाकण ठेवा. थोड्या वेळाने गॅस बंद करा. गरमागरम भातावरचं पिठलं खायला तयार.
advertisement
advertisement
@archees_kitchen11 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेहमीच्या पिठलं भातापेक्षा हे अशा पद्धतीने भातावरचं पिठलं करून पाहा आणि कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 9:22 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Pithala Bhat : पिठलं आणि भात वेगवेगळं बनवायची गरजच नाही; भातावरचं पिठलं, हटके रेसिपी









