Lemon Pickle : लिंबाचं लोणचं जमत नाही, मग बनवा घोळ लिंबू; साधी सोपी रेसिपी आणि औषधीही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ghol Limbu Recipe Video : एरवी लोणचं म्हणजे आंबट, तेलकट असतं, त्यामुळे सर्दी-खोकला होईल म्हणून अनेक जण जे खात नाही. पण घोळ लिंबू हा लिंबाच्या लोणच्याचा प्रकार वेगळा आहे. हे औषधी आहे.
लिंबापासून काही पदार्थ बनवायचा म्हटलं की सामान्यपणे बहुतेक जण त्याचं लोणचं बनवतात. पण लोणचं बनवणं वाटतं तितकं सोपं नाही. सगळ्यांना ते जमत नाही आणि त्याची प्रक्रियाही मोठी आहे. ज्यांना लिंबाचं लोणचं बनवणं जमत नाही किंवा त्यासाठी वेळ नाही तर मग तुमच्यासाठी लिंबाची अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी ती म्हणजे घोळ लिंबू.
एरवी लोणचं म्हणजे आंबट, तेलकट असतं, त्यामुळे सर्दी-खोकला होईल म्हणून अनेक जण जे खात नाही. पण घोळ लिंबू हा लिंबाच्या लोणच्याचा प्रकार वेगळा आहे. हे औषधी आहे. जितकं जुनं तितकं पौष्टीक. बनवून ठेवलं की 4-5 वर्षे टिकतं. तोंडाला चव नसेल, घरात कुणी आजारी असल तर अशावेळी तुम्ही हे घोळ लिंबू त्याला देऊ शकता. हा घोळ लिंबू प्रेग्नंट महिलांसाठी खास बनवला जातो.
advertisement
आता घोळ लिंबू कसा बनवायचा ते पाहू. यासाठी पातळ सालीचे मोठे आणि रसदार असे लिंबू घ्या. लिंबू स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरडी करून घ्या. काचेची बरणी धुवून स्वच्छ पुसून तीसुद्धा कोरडी करून घ्या. आता या बरणीत जितके मावतील तितके लिंबू भरा. लिंबू दाबून बरणीत भरायचे नाहीत. ते सुटसुटीत राहतील असेच असावेत.
advertisement
आता यात मीठ टाका. 4 लिंबू असतील तर 2 चमचे मीठ असं प्रमाण घ्या. बरणीचं झाकण टाकून बरणी हलवून घ्या म्हणजे मीठ त्या लिंबांना लागेल. महिनाभर बरणी अशीच ठेवायची आहे. मधमधे ती हलवत राहा म्हणजे मिठाचं पाणी लिंबाला चांगलं लागेल. पण याचा अर्थ ते खराब झाले असं नाही. हे लोणचं तयार व्हायला वेळ लागतो. जवळपास दीड महिना. काही दिवसांनी तुम्हाला लिंबाचा रंग बदललेला दिसेल. ते गुलाबजामसारखे काळे दिसू लागतील.
advertisement
Gayatri kulkarni's पाककला युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तुम्ही अशा पद्धतीने घोळ लिंबू बनवून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Lemon Pickle : लिंबाचं लोणचं जमत नाही, मग बनवा घोळ लिंबू; साधी सोपी रेसिपी आणि औषधीही










