Lemon Pickle : परिणिती चोप्रा खाते खास लिंबाचं लोणचं; बिनतेलाचं बनतं, संपूर्ण Recipe Video

Last Updated:

Lemon Pickle Recipe Video : काळं लिंबाचं लोणचं... वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. अभिनेत्री परिणिती चोप्राचं हे आवडतं लोणचं आहे. बिनतेलाचं हे लोणचं जे जितक्या जास्त दिवसाचं तितकं चांगलं, असं तिनं सांगितलं.

News18
News18
लोणचं म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. काही लोक लोणचं आरोग्यासाठी चांगलं नाही असं म्हणतात. लोणच्यामुळे सर्दी-खोकला होतो, असं सांगतात. पण काही लोणचं विशेषत: लिंबाचं लोणचं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. आजारी असल्यावर, तोंडाला चव नसेल तेव्हा तुमच्या आजीने, आईने तुम्हाला लिंबाचं लोणचं दिलं असेल. कारण यामुळे तोंडाला चव येतं असं म्हणतात. पण तुम्ही कधी काळं लिंबाचं लोणचं खाल्लं आहे का?
काळं लिंबाचं लोणचं... वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. अभिनेत्री परिणिती चोप्राचं हे आवडतं लोणचं आहे. एका व्हिडीओत परिणितीने सांगितलं की तिला लोणचं खूप आवडतं आणि त्यातही विशेषत: काला निंबू आचार म्हणजे काळं लिंबाचं लोणचं. बिनतेलाचं हे लोणचं जे जितक्या जास्त दिवसाचं तितकं चांगलं, असं तिनं सांगितलं.
advertisement
आता हे लोणचं बनवायचं कसं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात परिणीती चोप्राच्या लोणच्याच्या व्हिडीओसह या लोणच्याची रेसिपीही दाखवण्यात आली आहे.
व्हिडीओत दाखवल्यानुसार लिंबू घेऊन त्याला 4 चीर द्यायचे आहेत. जशी आपण भरली वांगी करण्यासाठी वांगी कापतो अगदी तशाच पद्धतीने लिंबू कापायचे आहेत. मीठ आणि काळं मीठ एकत्र करायची, हे मीठ त्या लिंबूच्या आत भरायचं आहे. हे लिंबू काचेच्या भरणीत भरायचे. आता यावर ओवा आणि जिरं यांची पूड करून ती या लिंबावर टाकायची. बरणीचं झाकण बंद करून बरणी थोडी हलवून ती 5 दिवस उन्हात ठेवून द्या.
advertisement
5 दिवसांनी तुम्ही बरणीचं झाकण उघडाल तर लिंबाचं रंग बदललेला दिसेल. ते नरमही झालेले दिसतील. हे तुमचं काळं लिंबाचं लोणचं तयार. तुम्ही हे तोंडी लावायला किंवा गरमागरम पराठ्यासोबत खाऊ शकता.
advertisement
(@prakshi_kitchen या इन्स्टाग्राम अकाऊंटवर परिणीतीच्या व्हिडीओसह लिंबाच्या रेसिपीचाही व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवून पाहा आणि कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lemon Pickle : परिणिती चोप्रा खाते खास लिंबाचं लोणचं; बिनतेलाचं बनतं, संपूर्ण Recipe Video
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement