मुलाला फक्त एकच दिवस टिफिन देते गिरीजा ओक, तरी महिनाभर खातो; अभिनेत्रीने सांगितली भन्नाट आयडिया
- Published by:Priya Lad
Last Updated:
Girija Oak Child : दररोज मुलांना टिफिनला काय द्यायचं हा प्रत्येक आयांना पडलेला प्रश्न. पण गिरीजा ओकला मात्र याचं टेन्शन नाही. ती फक्त एकच दिवस टिफिन बनवून देते, तरी तिचा मुलगा महिनाभर शाळेत टिफिन खातो. आता हे कसं काय? तर यामागील आयडियाही तिने सांगितली आहे.
उद्या आता मुलांना टिफिनला काय देऊ? बहुतेक आयांना पडलेला हा प्रश्न. मुलांचे खाण्याबाबत नखरे असतात, काही पदार्थ खात नाहीत, काही पदार्थ आवडत नाही, पण त्यांना हेल्दीही खायला द्यायचं असतं, मग ते कसं, त्यांना न आवडणारे, हेल्दी पदार्थ ते आवडीने कसे खातील यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते. पण गिरीजा ओकला मात्र याचं टेन्शन नाही. ती तिच्या मुलाला महिन्यातून फक्त एकदाच टिफिन देते तरी तिचा मुलगा महिनाभर खातो.
अभिनेत्री गिरीजा ओक जिला एक मुलगा आहे, ज्याचं नाव कबीर. जो शाळेत आहे. गिरीजा कबीरला टिफिनमध्ये काय देते हे तिने सांगितलं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल गिरीजा दररोज मुलासाठी टिफिन बनवत नाही. ती फक्त एकच दिवस टिफिन बनवून देते, तरी तिचा मुलगा महिनाभर शाळेत टिफिन खातो. आता हे कसं काय? तर यामागील आयडियाही तिने सांगितली आहे.
advertisement
गिरीजा ओकने सांगितलं की, "माझ्या मुलाच्या शाळेत अशी सिस्टम आहे की त्याला दररोज टिफिन द्यावं लागत नाही. महिन्यातून फक्त एकदाच टिफिन द्यावा लागतो. पण तो फक्त त्याच्यासाठी नाही तर संपूर्ण क्लाससाठी. वर्गात 22-23 मुलं आहेत तर मग त्यानुसार महिन्यातून एकदा तुमचा टर्न येतो. मग महिन्यातून एकदाच जेवण बनवायचं आहे पण 25 लोकांचं. कारण मुलांसह शिक्षक, हेल्पर्सही तेच खातात"
advertisement
गिरीजा ओक पुढे म्हणाली, "असं दररोज प्रत्येकाच्या घरातून जेवण येतं. भात, डाळ, पोळी, भाजी आणि सोबत सलाड, उन्हाळा असेल तर ताक वगैरे असे पदार्थ ठरलेले असतात. पण यातच इतका वेगळेपणा असतो कारण कुणी पंजाबी आहे, कुणी बंगाली आहे, कुणी गुजराती आहे, मी महाराष्ट्रीय आहे आणि आम्हाला आमच्या भागात ज्या पद्धतीने जेवण बनवलं जातं, त्या पद्धतीचं जेवण देण्यासाठी प्रोत्साहीत केलं जातं"
advertisement
"मुलं वेगवेगळ्या पद्धतीचं खातात पण एकाच वेळी सगळ्यांकडे सारखं जेवण असतं. त्यांना वेगवेगळी संस्कृतीही समजते"
advertisement
"तसंच ज्या दिवशी ज्या मुलाच्या घरातून जेवण असतं तो मुलगा स्पेशल असतो. म्हणजे रांग असेल तर तो त्या रांगेत पहिला उभा असेल, खेळताना तो खेळ सुरू करणार, वर्गात काही वाचायचं असेल तर तो पहिलं वाचणार", असंही गिरीजाने एका मुलाखातीत सांगितलं.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 2:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
मुलाला फक्त एकच दिवस टिफिन देते गिरीजा ओक, तरी महिनाभर खातो; अभिनेत्रीने सांगितली भन्नाट आयडिया











