पुण्यात घर आवरताना कचऱ्यासोबत गेले दागिने; चूक लक्षात येताच कचरावेचकांना फोन, रेखाताईंनी कचऱ्याची अख्खी गाडी उचकली अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
घरातील कचऱ्यासोबत फेकली गेलेली सोन्याची मौल्यवान अंगठी, एका कचरावेचक महिलेने चक्क कचऱ्याच्या मोठ्या कंटेनरमध्ये उतरून शोधून काढली आणि मालकाला परत केली.
पुणे : 'माणुसकी अजून जिवंत आहे' याचा प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी घटना वाघोलीतील विजय विहार सोसायटीत घडली आहे. घरातील कचऱ्यासोबत फेकली गेलेली सोन्याची मौल्यवान अंगठी, एका कचरावेचक महिलेने चक्क कचऱ्याच्या मोठ्या कंटेनरमध्ये उतरून शोधून काढली आणि मालकाला परत केली. रेखा साकट असे या प्रामाणिक महिलेचे नाव असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नेमका प्रसंग काय?
२२ फेब्रुवारी रोजी स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक रेखा साकट नेहमीप्रमाणे कचरा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. तिथे एका घराबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा आणि जुने साहित्य पडले होते. संबंधित कुटुंब दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाले होते. रेखा यांनी ते सर्व साहित्य नीट आवरून इमारतीखालील कचरा कंटेनरमध्ये ठेवले. मात्र, सायंकाळी त्या कुटुंबाला आपली सोन्याची अंगठी गहाळ झाल्याचे लक्षात आले.
advertisement
कचरा कंटेनरमध्ये शोधमोहीम
अंगठी कचऱ्यात गेल्याचा संशय आल्याने त्यांनी 'स्वच्छ' संस्थेच्या समन्वयक पौर्णिमा ओव्हाळ यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तो कंटेनर हलवू नका, अशी विनंती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता रेखा साकट आणि पौर्णिमा ओव्हाळ घटनास्थळी पोहोचल्या.
रेखा यांनी स्वतः कचऱ्याच्या मोठ्या कंटेनरमध्ये उतरून शोध सुरू केला. संबंधित नागरिकांना व्हिडिओ कॉलवर घेऊन त्या एकेक पिशवी तपासू लागल्या. अखेर, एका पिशवीत त्यांना ती सोन्याची अंगठी सापडली.
advertisement
गेल्या ७ वर्षांपासून रेखा साकट वाघोली परिसरात सेवा देत आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे नागरिक आणि कचरावेचक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले आहे. कचऱ्यात फेकले गेलेले सोने पुन्हा मिळवून देऊन रेखा यांनी समाजासमोर एक मोठा आदर्श उभा केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 9:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात घर आवरताना कचऱ्यासोबत गेले दागिने; चूक लक्षात येताच कचरावेचकांना फोन, रेखाताईंनी कचऱ्याची अख्खी गाडी उचकली अन्...







