संत बाळुमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी गुड न्यूज, इंदापूर–कोल्हापूर बसफेरीचा विस्तार, चेक करा वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करत इंदापूर आगाराने इंदापूर–कोल्हापूर बसफेरीचा विस्तार केला आहे.
पुणे: प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करत इंदापूर आगाराने इंदापूर–कोल्हापूर बसफेरीचा विस्तार केला आहे. ही बससेवा आता कोल्हापूरमार्गे आदमापूरपर्यंत धावणार असून, 13 नोव्हेंबरपासून ही सेवा नियमितपणे सुरू करण्यात आली आहे. या विस्तारित बससेवेचा लाभ संत बाळुमामा यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे. नव्या मार्गामुळे थेट बससेवा उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
ही बस इंदापूर येथून सकाळी 11.45 वाजता मार्गस्थ होऊन जंक्शन, नातेपुते, शिंगणापूर, दहीवडी, वडूज, पुसेसावली, कराड आणि कोल्हापूर असा प्रवास करत सायंकाळी 7.40 वाजता आदमापूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या फेरीत ही बस आदमापूर येथून सकाळी 5.30 वाजता निघून दुपारी 1.25 वाजता इंदापूर येथे दाखल होणार आहे.
advertisement
संत बाळुमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा
view commentsदररोजच्या बसफेरीसोबतच पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी संत बाळुमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून या सेवेचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेत डेपो मॅनेजर वैभव गोसावी आणि स्थानक प्रमुख संजय वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार असून, हा बदल प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची माहिती नियंत्रक विक्रम चंदनशिवे यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 10:19 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
संत बाळुमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी गुड न्यूज, इंदापूर–कोल्हापूर बसफेरीचा विस्तार, चेक करा वेळापत्रक









