पुणेकरांनो एक मिनिटही घराचा दरवाजा उघडा ठेवू नका; क्षणभराची चूक पडतेय महागात, 4 धक्कादायक घटना समोर

Last Updated:

पुणे शहरात 'दरवाजा उघडा' असल्याची संधी साधून घरात घुसणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत

घरात घुसून चोरी (Canva Image)
घरात घुसून चोरी (Canva Image)
पुणे: पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात पुणे शहरात 'दरवाजा उघडा' असल्याची संधी साधून घरात घुसणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. शहराच्या विविध भागांत अवघ्या काही क्षणांसाठी किंवा झोपेमध्ये दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेत चोरट्यांनी थेट घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या चार गंभीर घटना समोर आल्या आहेत. ज्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चार घटनांमध्ये लाखोंची चोरी:
१. एरंडवणे येथे चोरी: एरंडवणे येथील अर्चनानगर सोसायटीमध्ये ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी थेट आत प्रवेश केला. चोरट्यांनी काचेच्या कॉर्नर टेबलवर ठेवलेल्या दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
advertisement
२. धनकवडीत मंगळसूत्र लंपास: अशाच प्रकारे धनकवडी येथील चैतन्यनगर सोसायटीतही एका सदनिकेचा दरवाजा उघडा होता. चोरट्यांनी कसलीही चाहूल लागू न देता आत प्रवेश केला आणि कपाटातून तब्बल दोन लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडंट घेऊन पोबारा केला. याप्रकरणी ३६ वर्षीय सदनिकाधारकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
३. वारजे येथे लॅपटॉप चोरी: वारजे परिसरात पहिल्या मजल्यावर राहणारा एक तरुण झोपला असताना, घराचा दरवाजा उघडा राहिला. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी तरुणाच्या ऑफिसच्या बॅगेतून लॅपटॉप, हेडफोन आणि दहा हजार रुपयांची रोकड लांबवली. चोरी लक्षात आल्यानंतर या तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
४. मंगळवार पेठेत रखवालदाराच्या घरात चोरी: मंगळवार पेठेत लडकत पेट्रोल पंपाजवळील एका सोसायटीतील रखवालदाराच्या घरालाच चोरट्यांनी लक्ष्य केलं. रखवालदार कुटुंबीयांसह बाहेरगावी गेला असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातून दोन लाख ९९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी २७ वर्षीय रखवालदाराने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
या सर्व घटनांमध्ये नागरिकांनी केलेली 'दरवाजा उघडा ठेवण्याची' चूक महागात पडली आहे. त्यामुळे पुणेकरांनी रात्री झोपताना किंवा काही क्षणांसाठी घराबाहेर पडतानाही दरवाज्याची योग्य काळजी घेण्याचे आणि अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो एक मिनिटही घराचा दरवाजा उघडा ठेवू नका; क्षणभराची चूक पडतेय महागात, 4 धक्कादायक घटना समोर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement