सोलापुरात पुलाच्या पाडकामानंतर ही मेगाब्लॉक, या रेल्वे गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
या पुलाच्या पाडकामामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सोलापूर : सोलापूर शहरातील ब्रिटिशकालीन बांधण्यात आलेल्या 1922 सालच्या पुलाला 103 वर्ष पूर्ण झाल्यामुळे रविवारी 14 डिसेंबर रोजी पाडण्यात आले. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल 11 तासांचा मेगाब्लॉक घेतला. या पुलाच्या पाडकामामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक ते मरिआई चौक दरम्यान असणाऱ्या 103 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल जीर्ण झाल्याने तो पाडण्यात आला. पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पूल परिसरातील रेल्वे रूळ, विद्युत यंत्रणा आणि सुरक्षिततेच्या संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागामार्फत कमी-अधिक प्रमाणात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर या कालावधीत काही गाड्या रद्द, काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदलले जाणार आहे.
advertisement
रायचूर-विजयपुरा आणि विजयपुरा-रायचूर पॅसेंजर गाडी, पुणे सोलापूर आणि सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीला 30 मिनिटांनी नियंत्रित केले जाणार आहे. तर याशिवाय चेन्नई सेंट्रल अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी 90 मिनिटांनी उशिरा धावणार आहे. पुन्हा 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांपासून ते सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत विजयपुरा रायचूर पॅसेंजर ही गाडी होटगीपर्यंतच धावणार आहे. तर रायचूर विजयपूर ही पॅसेंजर गाडी होटगी येथूनच सुटेल. या कालावधीत कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस ही गाडी सुमारे 30 मिनिटांनी नियंत्रित केले जाणार आहे.
advertisement
ही एक्सप्रेस गाडी धावणार उशिरा
18 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान सायंकाळी 4 ते 07:30 या साडेतीन तासाच्या ब्लॉकमध्ये सोलापूर-हसन एक्स्प्रेस सुमारे 20 मिनिटे उशिरा धावणार आहे. तर बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेस ही गाडी 40 मिनिटे उशिरा धावणार आहे.
पूल पाडकामामुळे हे गाड्या रद्द
view comments15 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या 2 तासाच्या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 11415 सोलापूर - होसपेट एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 11416 होसपेट - सोलापूर ही एक्सप्रेस गाडी 15 डिसेंबर 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच सोलापूर पुणे एक्सप्रेस गाडी क्रमांक 11418 ही गाडी देखील रद्द करण्यात आली आहे. हा ब्लॉक सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 40 मिनिटाचा म्हणजेच 2 तास 30 मिनिटांचा राहणार आहे. या ब्लॉकदरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संबंधित गाड्यांची प्रवासापूर्वी माहिती तपासूनच प्रवास करावे, असे आवाहन वरिष्ठ मंडल प्रमंदक योगेश पाटील यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
December 15, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
सोलापुरात पुलाच्या पाडकामानंतर ही मेगाब्लॉक, या रेल्वे गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक











