Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, कल्याण-डोंबिवलीत हाडं गोठवणारी थंडी, हवामान विभागाडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
१५ डिसेंबरला तापमानात मोठी घट न होता, सध्याची थंडी कायम राहू राहण्याची शक्यता वर्तवली असून; आजचे ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली शहरातील हवामान अपडेट बघुयात.
राज्यात थंडीची लाट सुरू असून,उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्याने ठाणे जिल्ह्यांत तापमान १४°C आसपास राहू शकतो, त्यामुळे सकाळी आणि रात्री गारठा जाणवेल तर काही ठिकाणी किमान तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढेल. १५ डिसेंबरला तापमानात मोठी घट न होता, सध्याची थंडी कायम राहू राहण्याची शक्यता वर्तवली असून; आजचे ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली शहरातील हवामान अपडेट बघुयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे बदलापूरमध्ये नेहमीपेक्षा जास्त थंडी आज जाणवेल. किमान तापमान सुमारे १२°C आणि कमाल तापमान २४°C ते २८°C च्या दरम्यान असू शकते. थंडीची लाट असल्याने पारा घसरला आहे तर मुरबाड आणि शहापूरमध्ये कमाल तापमान २५°C ते ३३°C तर किमान तापमान 8°C ते 17°C पर्यंत खाली येऊ शकते. विशेषतः पहाटे मोठ्या प्रमाणात थंडी जाणवेल आणि दिवसा ऊन तर रात्री पुन्हा थंडीचा अनुभव येईल. त्यामुळे हवामान आल्हाददायक राहील.










