Shocking Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भावाचा मृतदेह घेऊन जात असताना बहिणीचा अपघातात मृत्यू
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Ambulance Accident : समृद्धी महामार्गावर भावाचा मृतदेह घेऊन जात असताना रुग्णवाहिकेच्या ट्रकला धडक दिल्यामुळे सावित्रीदेवी भागवती यांचा जागीच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर : मुंबईहून उत्तर प्रदेशकडे भावाचा मृतदेह घेऊन निघालेल्या कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळले आहे. समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिकेचा ट्रकला पाठीमागून झालेल्या भीषण अपघातात भावाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास जांबरगाव शिवारात घडली.
भावाचा मृतदेह घेऊन जात असताना बहिणीचा अपघातात मृत्यू
सावित्रीदेवी भागवती प्रसाद यादव (वय 49, रा. मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे. मूळ उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबीय सध्या मुंबईत वास्तव्यास होते. सावित्रीदेवी यांचे भाऊ लालजी यादव (वय 65) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून मूळ गावी नेण्यात येत होता.
रात्री एक वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात भरधाव वेगाने जाणाऱ्या त्यांच्या रुग्णवाहिकेने पाठीमागून ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतून प्रवास करणाऱ्या सावित्रीदेवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती भगवती प्रसाद यादव हे गंभीर जखमी झाले. इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी संदीपकुमार भगवती प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालकाविरुद्ध वैजापूर ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
या प्रकरणी संदीपकुमार भगवती प्रसाद यादव यांच्या तक्रारीवरून रुग्णवाहिकेच्या चालकाविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भावाचा मृतदेह घेऊन जात असताना बहिणीचा अपघातात मृत्यू








