'मी IPS अधिकारी बोलतोय!' एक फोन कॉल आणि ज्येष्ठ नागरिकाचे बँक खाते रिकामे, ठाण्यात काय घडलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
ठाण्यातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मनी लाँड्रिंग प्रकरणात डिजिटल अटकेची भीती दाखवून 21 लाखांचा गंडा बसला आहे.
ठाणे : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांना फसवण्याचा सायबर गुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिथे फसवे लोक फोन करून आधार कार्ड गैरव्यवहार, मनी लाँड्रिंग किंवा क्रेडिट कार्ड गैरवापर झाल्याचे भासवतात आणि अटक टाळण्यासाठी पैसे एका विशिष्ट बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगतात. ज्यामुळे ठाण्यातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मनी लाँड्रिंग प्रकरणात डिजिटल अटकेची भीती दाखवून 21 लाखांचा गंडा बसला आहे.
ठाण्याच्या घोडबंदर रोड भागात राहणारे नारायण रंगस्वामी हे त्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून त्यांना 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 फोन आला. त्यानंतर 4 डिसेंबर 2025 या दरम्यान त्यांना सिस्टम जनरेटेड ऑटोमेटेड अनोळखी मोबाईलवरून क्राईम ब्रँच अधिकारी प्रदीप कुमार आणि आयपीएस अधिकारी विजय खन्ना बोलतो असे मोबाईलवरून कॉलवरून सांगण्यात आले. तुम्ही दुसरा मोबाईल खरेदी केला असून त्यावरून अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून लोकांना धमक्या येत आहेत. त्यामुळे तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
advertisement
तुम्ही क्राईम ब्रँचशी संपर्क करा, असे सांगून व्हिडीओ कॉलवरून त्यांनी पुन्हा तशीच बतावणी करीत त्यांच्यासह त्यांच्या पत्नीची वैयक्तिक माहिती घेत त्यांचे आधारकार्ड सर्व्हेलन्सला असल्याचे सांगत तुमचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंध असल्याचाही त्यांनी असे अनेक आरोप केले. तसेच 538 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात एका घरातून 247 एटीएम कार्ड जप्त झाली. त्यात तुमच्या कॅनरा बँकेच्या खात्यात 27 लोकांनी पैसे पाठविल्याचा तसेच पाच लाखांमध्ये तुमचे खाते मनी लाँड्रिंग प्रकरणात विकल्याचाही त्या फसवणूक कर्त्यांनी आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करीत ठाणे शहरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मनी लाँड्रिंग प्रकरणात डिजिटल अटकेची अशी भीती दाखवून 21 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी रविवारी दिली.
advertisement
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नारायण यांनी 11 डिसेंबर रोजी कासारवडवली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आता या फसव्या अधिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायबर पोलिसांचा इशारा:
view commentsडिजिटल अटकेच्या फसवणुकीबाबत पोलीस वारंवार सूचना देत आहेत, तरीही ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. अशा कोणत्याही अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नका, अशी सायबर पोलिसांची सूचना आहे. कोणतीही बँक किंवा पोलीस कधीही फोनवर वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागत नाहीत.
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
December 15, 2025 10:05 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
'मी IPS अधिकारी बोलतोय!' एक फोन कॉल आणि ज्येष्ठ नागरिकाचे बँक खाते रिकामे, ठाण्यात काय घडलं?










