Vasai News : वसई विद्यार्थीनी मृत्यू प्रकरणी शिक्षण विभागाची शाळेवर मोठी कारवाई!
Last Updated:
Vasai Student Deat : वसईत उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली. ज्यात नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते जाणून घ्या.
वसई : गेल्या काही दिवसांपूर्वी वसईच्या शाळेतील घडलेला प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात हादरुन गेला होता ज्यात उशिरा आल्यामुळे उठाबशांची शिक्षा दिली. मात्र, त्यामुळे एका सहावीतल्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा मुद्दा सर्वत्र चर्चत आल्याने आणि त्याबद्दल संपात झाल्याने अखेर शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
वसईतील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. कारण शाळेतील काही विद्यार्थ्यांना उशिरा आल्यामुळे उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनावर मोठा विरोध उभा राहिला आणि सर्व स्तरातून संताप व्यक्त केला गेला. पालघर जिल्हापरिषद प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
अखेर घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
चौकशीनंतर समोर आले की शाळेने विद्यार्थ्यांच्या विचार न करता शिक्षण नियमांचे उल्लंघन केले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांच्या सुनावणीमध्ये असे निष्पन्न झाले की महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 च्या कलम 12(1)(क) आणि 14(1)(ख) नुसार शाळेने नियम मोडले. त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली.
advertisement
अन्य विद्यार्थ्याच्या शिक्षणाचं नेमकं काय होणार?
महाराष्ट्र शासनाने ही शिफारस अत्यंत गांभीर्याने घेतली. शासनाचे कार्यासन अधिकारी प्रमोद कदम यांनी 13 डिसेंबर 2025 रोजी परिपत्रक जारी करत इंग्रजी आणि हिंदी माध्यमातील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेची शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
या प्रकरणातून शाळा ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत त्यांनी आवश्यक लक्ष दिलेले नाही. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानुसार प्रभारी गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख अशा तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले गेले आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 9:36 AM IST










