Pune Metro : पुणेकरांची सोय! गर्दी आणि वाहतूक कोंडीतून मुक्ती; मेट्रोबाबत मोठी आणि महत्त्वाची घोषणा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आता पुण्यात अतिरिक्त ४५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून, यापैकी २७ किलोमीटरचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.
पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार वेगाने होत असून, पुढील केवळ दोन वर्षांच्या कालावधीत आणखी २७ किलोमीटर लांबीचा नवीन मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. ही महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्याच्या मेट्रो प्रकल्पांच्या प्रगतीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
पुणे मेट्रोचा सध्या ३३ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. ज्यावरून दररोज सरासरी २.२३ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. आता पुण्यात अतिरिक्त ४५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून, यापैकी २७ किलोमीटरचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.
advertisement
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, मुंबईत आतापर्यंत एकूण ९१ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे कार्यरत असून, दररोज ९ लाख ५० हजार प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत. मुंबई महानगर प्रदेशात सध्या १७०.४० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू आहे. ज्यापैकी पुढील दोन वर्षांत तब्बल १३२ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. दरवर्षी ५० ते ६० किलोमीटर मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरातही ४० किलोमीटर मेट्रोचं काम पूर्ण झालं असून, १.१ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. नागपूरमध्येही अजून ४३ किलोमीटर मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून, ते दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या आकडेवारीवरून, पुणे, मुंबई आणि नागपूरसह प्रमुख शहरांतील पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर राज्य सरकारचा कटाक्ष असल्याचं स्पष्ट होतं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro : पुणेकरांची सोय! गर्दी आणि वाहतूक कोंडीतून मुक्ती; मेट्रोबाबत मोठी आणि महत्त्वाची घोषणा










