Mumbai Local: रेल्वेकडून 'डबल' भेट! 10 लोकल फेऱ्यांची वाढ अन् 2 नवीन स्थानक खुली; 'या' महत्त्वाच्या मार्गावर आजपासून सुरुवात

Last Updated:

Nerul–Uran Local Trains Increased : नेरूळ-बेलापूर-उरण रेल्वेमार्गावर लोकलच्या 10 नव्या फेऱ्या सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच तारघर आणि गव्हाण ही दोन नवी स्थानके सेवेत दाखल झाल्याने नवी मुंबईतील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत झाली आहे.

Nerul–Uran Local Trains Increased
Nerul–Uran Local Trains Increased
मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत मोठी खुशखबर आली आहे. आता दररोजच्या गर्दीपासून यांची सुटका होणार आहे कारण आजपासून नेरुळ-बेलापूर-उरण या मार्गावर 10 लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट नेमकी काय असेल ते खालील प्रमाणे पाहूयात.
प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय!
बेलापूर-नेरुळ-उरण विभागात 10 अतिरिक्त जोड्या लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे उरण मार्गावरील लोकल सेवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एवढेच नाही तर उरण रेल्वे मार्गावरील दोन तरघर आणि गावन ही स्थानके प्रवाशांसाठी सुरु होणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असलेले तरघर स्थानक भविष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक सोयीचे ठरेल तसेच परिसरातील नागरिकांना थेट उपनगरीय रेल्वेचा लाभ मिळेल. दुसरीकडे गावन स्थानक सुरू झाल्यामुळे उरण परिसरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
advertisement
लोकलच्या वेळा कशा असतील?
नवीन विस्तारित वेळापत्रकानुसार उरण येथून पहिली लोकल सकाळी 5.35 वाजता सुटेल तर शेवटची लोकल रात्री 10.05 वाजता निघेल आणि बेलापूरहून लोकल सेवा सकाळी 5.45 ते रात्री 10.15 या वेळेत उपलब्ध असतील तसेच नेरुळहून सकाळी 6.05 वाजल्यापासून रात्री 9.30 वाजेपर्यंत लोकल सेवा सुरू राहतील. या सुधारित वेळापत्रकामुळे प्रवाशांना सकाळी आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्येही अधिक पर्याय मिळणार आहेत.
advertisement
या नव्या सेवांमुळे उरण लाईनवरील एकूण लोकल सेवांची संख्या 40 वरून थेट 50 इतकी होणार आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल, प्रवास अधिक सुलभ होईल आणि वेळेची बचत होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी नवीन वेळापत्रकाची माहिती करून घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. उरण रेल कॉरिडोरवरील हा बदल नवी मुंबईच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: रेल्वेकडून 'डबल' भेट! 10 लोकल फेऱ्यांची वाढ अन् 2 नवीन स्थानक खुली; 'या' महत्त्वाच्या मार्गावर आजपासून सुरुवात
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement