Gold Silver Price Today: चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्याची किंमत किती?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Silver Price : आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. सोनं-चांदीच्या दराने रेकोर्ड ब्रेक दर गाठला आहे.
Gold Silver Price: मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात जबरदस्त तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. सोनं-चांदीच्या दराने रेकोर्ड ब्रेक दर गाठला आहे. चांदीने प्रति किलो २,००,००० रुपयांचा दर गाठल्यानंतर आज काहीशी घसरण दिसून आली. तर, दुसरीकडे सोन्याने मात्र ऑलटाइम हाय दर गाठला आहे.
आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतींनी सर्वोच्च दर गाठला आहे. चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज, सोमवारी, बाजारात सोनं ७३२ रुपयांच्या तेजीसह खुले झाले. जीएसटीशिवाय १,३३,४४२ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर आता १,३७,४४५ रुपये प्रति १० ग्रॅम झालं आहे. दुसरीकडे, आज चांदीच्या किमतीत २९५८ रुपयांची घसरण झाली आहे. आज, जीएसटीशिवाय चांदी १,९२,२२२ रुपये प्रति किलोवर उघडली. आता जीएसटीसह ती १,९७,९८८ रुपयांवर पोहोचली आहे.
advertisement
शुक्रवारी, जीएसटीशिवाय चांदी १,९५,१८० रुपये प्रति किलोवर बंद झाली आणि जीएसटीशिवाय सोने १,३२,७१० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत सोन्याचा भाव ५७,७०२ रुपयांनी वाढला आहे. तर चांदी १,०६,२०५ रुपयांनी वाढली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव आज जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,२५,८९९ रुपये झाला आहे आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅम १,०३,०८४ रुपये झाला आहे.
advertisement
चांदीच्या किमती आता प्रति किलो १,९५,१८० रुपयांच्या सर्वोच्च वरून २,९५८ रुपयांनी कमी झाल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोनदा दर जाहीर करते: एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे सायंकाळी ५ वाजता दर जाहीर होतात.
>> कॅरेटनुसार सोन्याचे भाव
२३ कॅरेट सोन्याच्या दरात ७२९ रुपयांनी वाढ झाली असून प्रति १० ग्रॅम १,३२,९०८ रुपयांवर उघडले. जीएसटीसह त्याची किंमत १,३६,८९५ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
advertisement
२२ कॅरेट सोन्याचा दर ६७१ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,२२,२३३ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह, हा दर १,२५,८९९ रुपयांवर आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या दरात ५४९ रुपयांनी वाढ झाली असून प्रति १० ग्रॅमसाठी एक लाख ८२ रुपये इतका दर झाला. जीएसटीसह त्याची किंमत १,०३,०८४ प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.
१४ कॅरेट सोन्याची किंमत देखील ₹४२९ ने कमी झाली. आज ते ₹७८,०६४ वर उघडले आणि आता जीएसटीसह ₹८०,४०५ वर आहे.
advertisement
(Disclamier: IBJA कडून हे दर जाहीर केले जातात. प्रत्येक शहरानुसार या दरांमध्ये १००० ते २००० रुपयांचा फरक दिसू शकतो.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price Today: चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्याची किंमत किती?










