advertisement

पुणेकर महिलांसोबत मोठं कांड, ५ महिन्यांपासून आंध्रप्रदेशात लपून बसला पोलीस; अखेर पुणे पोलिसांनी शिकवला धडा

Last Updated:

खाकी वर्दीचा धाक दाखवून आणि घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून अनेक महिला आणि व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. मात्र, आता अखेर निलंबित पोलीस पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

पोलीस हवालदाराला अटक (AI Image)
पोलीस हवालदाराला अटक (AI Image)
पुणे: खाकी वर्दीचा धाक दाखवून आणि घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून अनेक महिला आणि व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. मात्र, आता अखेर निलंबित पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (५२) पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून फरार असलेल्या जगतापला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून फिल्मी स्टाईलने अटक केली.
फसवणुकीचा 'विशाल' पाढा
गणेश जगतापवर पुणे शहरात फसवणुकीचे एकामागे एक गंभीर गुन्हे दाखल आहेत
कोथरूड प्रकरण: एका महिलेकडून १७ लाख रुपये रोख आणि तब्बल ७३ तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली.
भारती विद्यापीठ प्रकरण: पार्लर व्यावसायिक महिलेला मुलीच्या शिक्षणाचे आणि आजारपणाचे कारण सांगून अडीच लाख रुपये आणि ६ तोळे सोन्याचे दागिने लांबवले.
advertisement
चतुःश्रृंगी (औंध) प्रकरण: एका सराफ व्यावसायिकाला निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी करून गंडा घातला.
आंध्रप्रदेशातील 'कडप्पा' गावात लपला होता आरोपी
ऑगस्ट २०२४ मध्ये विशेष शाखेत बदली होऊनही हजर न होता जगताप फरार झाला होता. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. तांत्रिक तपासावरून तो आंध्रप्रदेशातील फुलपथरू गावात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक स्नेहल थोरात यांच्या पथकाने थेट आंध्रप्रदेश गाठून त्याला ताब्यात घेतले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर महिलांसोबत मोठं कांड, ५ महिन्यांपासून आंध्रप्रदेशात लपून बसला पोलीस; अखेर पुणे पोलिसांनी शिकवला धडा
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement