advertisement

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 6 महिने बंद असलेली मोनोरेल पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज; कधीपासून धावणार?

Last Updated:

Monorail Update News : मुंबईतील प्रवशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. लवकरच मोनोरेल सुरु होण्याची शक्यता आहे. पण कधी सुरु होणार ते एकदा बातमीत सविस्तर वाचा.

Mumbai Monorail restart latest update
Mumbai Monorail restart latest update
मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या मोनोरेल प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नव्या माहितीनुसार प्रवाशांची प्रतीक्षा आता किती दिवसांत संपणार किंवा मोनोरेल सेवा कधी सुरू होणार याबाबत स्पष्ट माहिती मिळणार आहे.
मोनोरेलच्या फेऱ्या पुन्हा सुरू होणार
साडेचार महिन्यांपासून बंद असलेली संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) ते चेंबूर ही मोनोरेल मार्गिका लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मोनोरेल पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली इंडिपेंडंट सेफ्टी असेसमेंट ही महत्त्वाची सुरक्षा तपासणी सध्या सुरू आहे अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
20 सप्टेंबरपासून मोनोरेल ठप्प
मोनोरेलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने आणि मार्गिकेवर नवीन यंत्रणा बसवण्यासाठी 20 सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत जुनी यंत्रणा काढून टाकून नवीन यंत्रणा बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यासोबतच मोनोरेलच्या ताफ्यात 10 नव्या गाड्यांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत.
advertisement
एमएमआरडीएने गेल्या आठवड्यात ISA सुरक्षा तपासणी सुरू केली असून ती अजून काही दिवस चालणार आहे. सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतर मोनोरेल सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले जाईल.
दरम्यान मोनोरेलची CMRS तपासणीही होणार आहे. यासाठी निवृत्त अधिकाऱ्याची इंडिपेंडंट इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तपासणी प्रक्रिया सुरू होईल.मोनोरेलच्या संचालन आणि देखभालीसाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीने सर्वात कमी म्हणजे 296 कोटी रुपयांची निविदा दाखल केली असून पाच वर्षांसाठी मोनोरेल चालवण्याचे कंत्राट या कंपनीला मिळण्याची शक्यता आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 6 महिने बंद असलेली मोनोरेल पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज; कधीपासून धावणार?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement