Mumbai Local : मोठी बातमी! मुंबई लोकलबाबत केंद्र सरकारचा नवा प्लान; वाचा सविस्तर

Last Updated:

Mumbai Local News : मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई लोकल बाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईसाठी स्वयंचलित दरवाजांच्या नॉन-एसी लोकल; चेन्नईत दोन रेकची बांधणी सुरू
मुंबईसाठी स्वयंचलित दरवाजांच्या नॉन-एसी लोकल; चेन्नईत दोन रेकची बांधणी सुरू
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दररोज सुमारे 60 लाखांहून अधिक प्रवासी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सुमारे 3 हजार लोकल फेऱ्यांमधून प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या दुर्घटनेनंतर लोकल गाड्यांमधील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून बंद दरवाजांच्या लोकलची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
मुंबई लोकलचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार
या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी स्वयंचलित दरवाजे असलेल्या दोन नॉन-एसी लोकल ट्रेन रेकची बांधणी चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी येथे सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 3 डिसेंबर रोजी लोकसभेत मुंबईतील खासदार वर्षा गायकवाड आणि संजय दिना पाटील यांनी लोकलमधील गर्दी आणि त्यातून होणाऱ्या अपघातांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना रेल्वे मंत्र्यांनी ही माहिती सभागृहाला दिली.
advertisement
या नव्या ईएमयू रेकमध्ये स्वयंचलित दरवाज्यांसोबतच दोन डब्यांमधील वेस्टिब्युल जोडणी, छतावर विशेष व्हेंटिलेशन युनिट आणि दरवाजांजवळ हवेच्या वहनासाठी झडपयुक्त खिडक्या असतील. यामुळे नॉन-एसी असूनही प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि तुलनेने आरामदायी प्रवास करता येईल असा रेल्वेचा दावा आहे.
दरम्यान मध्य रेल्वेने यापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये एका लोकल रेकवर ऑटोमॅटिक दरवाज्यांचा प्रयोग केला होता. या रेकच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि महाव्यवस्थापकांनी त्याची पाहणीदेखील केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे सध्या धावणाऱ्या साध्या लोकल गाड्यांचे स्वयंचलित दरवाज्यांत रूपांतर शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या लोकल सेवेत आल्यानंतरच अशा सुधारणा करण्यात येणार आहेत.
advertisement
याशिवाय पुढील पाच वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 238 नव्या वातानुकूलित लोकल टप्प्याटप्प्याने खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या लोकलच्या खरेदीला काही प्रवासी संघटनांनी विरोध दर्शवला असला तरी सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मोठी बातमी! मुंबई लोकलबाबत केंद्र सरकारचा नवा प्लान; वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement