Pune : रेल्वे इंजिनमध्येच बसवला 'तिसरा डोळा', रेल्वे धावणार सुसाट; प्लॅन नेमका काय?
Last Updated:
Indian Railways Update : भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आता तुम्हाला अधिक सुरक्षा मिळणार आहे. मात्र त्यासाठी कोणता प्लॅन आखण्यात आलेला आहे तो जाणून घ्या.
पुणे : भारतातील लाखोंच्या संख्येने नागरिक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेच्या मार्गावर अनेक समस्या येतात त्यामुळे रेल्वेला विलंब होत असतो. मात्र त्यातील एक समस्या आता सुटणार असून प्रवाशांना वेळेवर त्याच्या स्थानकात पोहचता येणार आहे.
चालकाला लांबूनच दिसणार पुढचा सिग्नल
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून कवच 4.0 ही आधुनिक सुरक्षा प्रणाली लागू केली जात आहे. ही प्रणाली इंजिनमध्ये बसवली जाते आणि पुढील सिग्नलची माहिती चालकाला सुमारे सात किलोमीटर आधीच केबिनमधील स्क्रीनवर दिसते. त्यामुळे सिग्नल लाल असल्यास किंवा पुढे अडथळा असल्यास चालक वेळेआधीच वेग कमी करू शकतो. गरज पडल्यास ही यंत्रणा स्वयंचलितपणे ब्रेक लावून रेल्वे थांबवते.
advertisement
पहिल्यांदा हा प्रयोग कुठे सुरु करणार?
पुणे विभागात सुमारे 700 किमी मार्गांपैकी 250 किमीपेक्षा जास्त अंतरावर नॉन-सिग्नलिंग कवचची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पुणे-कोल्हापूर आणि दौंड-मनमाड या मार्गांवरही प्रणालीची चाचणी पूर्ण झाली आहे. देशभरातील 10 हजार इंजिनमध्ये कवच 4.0 बसवण्याचे काम सुरू असून 9 हजार किमी रेल्वेमार्गांवर हे तंत्रज्ञान सुरु केले जात आहे.
advertisement
नेमका कसा होणार फायदा?
कवचमुळे समोरासमोर धडक, पाठीमागून धडक किंवा सिग्नल तोडण्याच्या घटना टळतील. एकाच ट्रॅकवर दोन गाड्या आल्यास ही प्रणाली आपोआप ब्रेक लावते. वेगमर्यादा ओलांडल्यास गाडीचा वेग कमी करते. रेल्वे फाटक उघडे असल्यास किंवा लूप लाईनवर वेग जास्त असल्यासही ही यंत्रणा चालकाला मदत करते. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि नियंत्रित होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 11:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : रेल्वे इंजिनमध्येच बसवला 'तिसरा डोळा', रेल्वे धावणार सुसाट; प्लॅन नेमका काय?







