Gold-Silver prices Today: चीन-अमेरिकेत मोठ्या हालचाली, आठवड्याच्या सुरुवातीलाच ८००० रुपयांनी घसरले दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोने आणि चांदीच्या दरात MCX वर 8000 रुपयांची मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान, पण तज्ज्ञ Enrich Money, Geojit Investments यांना दीर्घकालीन तेजीची शक्यता.
सोने आणि चांदीच्या किमतीत सध्या मोठी उलथापालथ होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच, म्हणजेच सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सराफा बाजारात मोठी घसरण झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ही घसरण पाहून घाबरून जाण्याऐवजी, तज्ज्ञ याकडे एक संधी म्हणून पाहत आहेत. सोन्या चांदीच्या दरात मोठा भूकंप आला आहे. MCX वर हे दर 8000 रुपयांनी कोसळले आहेत.
चांदीचे दर 8000 रुपयांनी कोसळल्यामुळे पुन्हा चांदी 2.50 लाख रुपयांहून कमी आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं तर चांदी घेणाऱ्यांना दिलासा मिळाला. चांदीचे दर आता प्रति किलो २ लाख ३५ हजारवर पोहोचले आहेत. तर सोन्याचे दर १ लाख ५८ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या चांदी आपल्या हाय लेव्हलवरुन १ लाख ८४ हजार रुपयांनी कोसळली असून आताचे दर अर्धाहून कमी आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे.
advertisement
प्रॉफिट बुकिंग आणि अमेरिकन डॉलरच्या स्थिरतेमुळे किमतींवर तात्पुरता दबाव आला असला, तरी दीर्घकालीन कल अजूनही तेजीचाच असल्याचे संकेत मिळत आहेत. सोन्याचे दर अंदाजे ०.२७% ने घसरून ५,०३३ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. चांदीचे दर २.०८% पेक्षा जास्त घसरून ७६.३४ डॉलर प्रति औंसवर आली आहे.
'एनरिच मनी'चे सीईओ पोनमुडी आर. यांच्या मते, गुंतवणूकदार आता घाबरून विक्री करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडले आहेत. अमेरिकेतील वास्तविक उत्पन्न सध्या एका मर्यादेत असल्याने सोन्यावर कोणताही मोठा दबाव येण्याची शक्यता कमी आहे. उलट, सध्याची घसरण ही मध्यम-मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते.
advertisement
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे हरीश व्ही यांच्या मते, सध्या जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम आहे. अशा वेळी सोने हे 'सुरक्षित आश्रय' (Safe-haven) मानले जाते. त्यामुळे, जेव्हा जेव्हा भाव कमी होतील, तेव्हा सोने खरेदी करणे हे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल.
अमेरिकेत जानेवारी महिन्यात महागाईत अवघी ०.२% वाढ झाली. यामुळे फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदरात कपात करण्याची शक्यता बळावली आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा सोन्याचे आकर्षण वाढते. सध्या चीनमध्ये 'लूनर न्यू इयर'च्या सुट्ट्या असल्याने भौतिक मागणी थोडी मंदावली आहे. मात्र, चिनी गुंतवणूकदारांचा सोन्याकडे असलेला ओढा कायम आहे.
advertisement
टेक्निकल चार्ट पाहता सोने ५,००० डॉलरच्या पातळीवर मजबूत आहे. जोपर्यंत ते ४,९०० डॉलरच्या वर आहे, तोपर्यंत तेजीची शक्यता आहे. डॉलर कमकुवत झाल्यास भाव ५,१५० ते ५,३५० डॉलर पर्यंत जाऊ शकतात.चांदीसाठी ८५ डॉलरची पातळी पार करणे महत्त्वाचे आहे. औद्योगिक क्षेत्रातील (सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स) वाढत्या मागणीमुळे चांदी दीर्घकाळात ९० ते १०५ डॉलर पर्यंत मजल मारू शकते.
advertisement
डिस्क्लेमर: या बातमीमध्ये दिलेली माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. हे कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक सल्ले नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी किंवा नुकसानीसाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 11:25 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold-Silver prices Today: चीन-अमेरिकेत मोठ्या हालचाली, आठवड्याच्या सुरुवातीलाच ८००० रुपयांनी घसरले दर







