Railway Update: रेल्वेचा मोठा निर्णय! सोलापुरातून मुंबई, पुण्याला जाणं सोपं, आंध्रासाठी स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Railway Update: रेल्वेच्या या निर्णयामुळे सोलापुरातून मुंबई, पुणे आणि आंध्र प्रदेशाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
सोलापूर - होळीचा सण आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी असते. या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर विभागातून धावणाऱ्या 10 विशेष रेल्वे गाड्यांना जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई, पुणे आणि आंध्र प्रदेशाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
मुंबई मार्गावरील प्रवाशांची सोय
सोलापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांचा नेहमीच मोठा ओघ असतो. हे लक्षात घेऊन सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) या गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक 01435 सोलापूर - लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई ही साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत धावणार होती. आता ही गाडी दर मंगळवारी 14 जुलै 2026 पर्यंत धावेल. ट्रेन क्र. गाडी क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - सोलापूर साप्ताहिक विशेष ही परतीच्या प्रवासासाठी गाडी दर बुधवारी 15 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
advertisement
दक्षिण भारतासाठीही विशेष सुविधा
आंध्र प्रदेशातील अनकापल्लेकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठीही विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. ट्रेन क्र. 01477 सोलापूर-अनकापल्ले ही साप्ताहिक गाडी दर शुक्रवारी 10 जुलै 2026 पर्यंत धावेल. गाडी क्रमांक 01478 अनकापल्ले-सोलापूर ही गाडी दर शनिवारी 11 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.
advertisement
दैनिक विशेष गाड्यांचाही लाभ कायम
सोलापूर-दौंड (01461/01562), सोलापूर-कलबुर्गी (01465/01466) आणि हडपसर-हरंगूळ (01487/01488) या अनारक्षित दैनिक विशेष गाड्यांची सेवाही 15 जुलै 2026 पर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नियमित गाड्यांचे आरक्षण अनेक महिने आधीच पूर्ण होते. अशा वेळी या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना वेटिंग लिस्टपासून सुटका मिळेल. सोलापूरसह दौंड आणि कलबुर्गी मार्गावरील प्रवाशांनाही या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 11:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Railway Update: रेल्वेचा मोठा निर्णय! सोलापुरातून मुंबई, पुण्याला जाणं सोपं, आंध्रासाठी स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक









