तुमच्या शेतातला ऊस अचानक पिवळा होतोय का? त्यामागची कारणे काय? एक्स्पर्टने थेट सांगितलं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sugarcane Farming : उसाची वाढ जोमात असतानाच अचानक पाने पिवळी पडू लागली, मधला कोंब कमकुवत झाला किंवा सुकू लागला, तर शेतकऱ्यांनी सावध होण्याची गरज आहे.
advertisement
लवकर ओळख कशी करावी? - एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार, या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या उसामध्ये वरची पाने पिवळी दिसतात आणि मधला “आई शूट” कमजोर पडतो. संशयास्पद झाड उपटून पाहिल्यास खोडाच्या आत लहान छिद्रे, कुजलेले भाग दिसतात. अनेकदा खोडातून व्हिनेगरसारखा तीव्र वास येतो, जो किडीच्या उपस्थितीचा स्पष्ट संकेत मानला जातो.
advertisement
बाधित झाडांची तात्काळ विल्हेवाट - ज्या झाडांवर प्रादुर्भाव स्पष्ट दिसतो ती झाडे शेतात ठेवणे धोकादायक ठरू शकते. अशी झाडे पूर्णपणे उपटून शेताबाहेर काढावीत. त्यांची सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावावी किंवा जाळून टाकावे. यामुळे कीड इतर निरोगी उसामध्ये पसरण्यापासून रोखता येते. ही पद्धत सर्वाधिक प्रभावी मानली जाते.
advertisement
प्रादुर्भाव जास्त असल्यास काय करावे? - जर शेतात मोठ्या प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल आणि हाताने झाडे काढणे पुरेसे ठरत नसेल, तर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य कीटकनाशकाची निवड करून शिफारशीनुसार फवारणी करावी. फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यप्रकाश कमी असताना करणे अधिक परिणामकारक ठरते. डोस, फवारणीची पद्धत आणि अंतर याबाबत कृषी विभाग किंवा अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
advertisement
advertisement









