advertisement

Solapur accident: सोलापूर हादरलं! अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ मित्रांचा जागीच मृत्यू

Last Updated:

Solapur accident: सोलापूर रूपाभवानी मंदिर परिसरात पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत नागेच गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी यांचा जागीच मृत्यू, पोलिसांनी तपास सुरू केला.

News18
News18
प्रितम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: नियतीनं घात केला आणि तीन तरुणांचा जागीच जीव गेला. सोलापूर शहरात आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. शहरातील प्रसिद्ध रूपाभवानी मंदिर परिसरात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडला. मृत तिन्ही तरुण एकाच दुचाकीवरून जात होते. रूपाभवानी मंदिर परिसरातून जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले आणि वाहनचालक तिथून पसार झाला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती, मात्र अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.
नागेच गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी असं मृत तरुणांची नावं असल्याची माहिती मिळाली आहे. हे तिन्ही तरुण ऐन उमेदीच्या वयातील असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गवंडी, पोरे आणि चनशेट्टी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून सध्या घटनेचा पंचनामा सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. हिट अँड रनचा हा प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur accident: सोलापूर हादरलं! अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ मित्रांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement