advertisement

अजितदादा गेले, काही तासांतच त्या ७५ फायलींवर सह्या, अधिकाऱ्यांचा प्रताप, रोहित पवार संतापले

Last Updated:

गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना संवेदना नावाची गोष्ट उरली आहे की नाही? असा सवाल जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

रोहित पवार-अजित पवार
रोहित पवार-अजित पवार
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या काही तासांतच अल्पसंख्याक विभागाच्या ७५ विचाराधीन असलेल्या फायलींवर अधिकाऱ्यांनी सह्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ज्या फायलींवर मंत्री म्हणून अजित पवार आणि माणिकराव कोकाटे विचार करीत होते, त्याच फायलींवर कोणताही मागचा पुढचा विचार न करता मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना संवेदना नावाची गोष्ट उरली आहे की नाही? असा सवाल जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांच्या प्रतापावर संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. राज्य शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्य शोक सागरात बुडाले असताना मात्र मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने फाईलींवर सह्या करून 'स्वार्थ' पाहिल्याची चर्चा आहे.

रोहित पवार म्हणाले, वंगाळ झालंय सगळंच!

advertisement
अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या वेगाने विचाराधीन फायलींवर अधिकाऱ्यांकडून सह्या केल्या गेल्या ते पाहता सगळंच वंगाळ झालंय, असा वाटायला लागलंय अशा संतप्त भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या. सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले.
advertisement

अजित पवार यांच्या जाण्याने रोहित पवार प्रचंड व्यथित

अजित पवार यांच्या अपघाती जाण्याने पुतण्या रोहित पवार प्रचंड व्यथित झाले आहेत. अजित पवार यांचा मृत्यू हा घात की अपघात असा प्रश्न विचारून त्यांनी सनसनाटी दावे करणारी पत्रकार परिषद घेतली. माझा काका गेलाय, सरकारला उत्तरे द्यावीच लागतील म्हणून त्यांनी व्यवस्थेवर दबाव आणला.
advertisement

त्या फायलींवर सह्या करायला कुणाचे आदेश? मंत्रालयात जोरदार चर्चा

अल्पसंख्याक विभागाने स्थगित असलेल्या ७५ शाळांना अल्पसंख्याक संस्था किंवा शाळांचा दर्जा दिला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे अजित पवार यांचे ज्यादिवशी निधन झाले, त्याच दिवशी सात संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच इतरही संस्थांना परवानगी दिल्याच्या तारखा या दुखवट्यादरम्यानच्या आहेत. त्यामुळे मंत्रालयातूल कोणत्या अधिकाऱ्याने हे कारस्थान केले, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा गेले, काही तासांतच त्या ७५ फायलींवर सह्या, अधिकाऱ्यांचा प्रताप, रोहित पवार संतापले
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement