नववर्षाचा प्लॅन बदला! ‘इंडिगो’चा पुन्हा खोळंबा, पुण्यातून 'या' शहरांना जाणारी-येणारी विमाने रद्द!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Flights: पुण्यातील इंडिगोच्या विमानसेवेचा पुन्हा खोळंबा झाला आहे. 31 डिसेंबरर्यंतची प्रमुख शहरांतील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीकडून मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका अनेक प्रवाशांना बसला होता. आता पुणेकरांनाही पुन्हा या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पुणे विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सच्या काही येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानसेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या सेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने सोमवारी दिली.
काही प्रमुख मार्गांवरील इंडिगो विमानसेवा रद्द
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे–वाराणसी, पुणे–बेंगळुरू, गुवाहाटी–पुणे आणि पुणे–चेन्नई या मार्गांवरील काही विमानसेवा रद्द झाल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये वाराणसीहून पुण्याला येणारी इंडिगोची फ्लाइट क्रमांक 6E 6884 आणि पुण्याहून वाराणसीला जाणारी 6E 497, बेंगळुरूहून पुण्याला येणारी 6E 6876 आणि पुण्याहून बेंगळुरूला जाणारी 6E 6877 यांचा समावेश आहे. तसेच गुवाहाटीहून पुण्याला येणारी 6E 746 आणि पुण्याहून चेन्नईला जाणारी 6E 918 ही उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.
advertisement
रद्द करण्यात आलेल्या विमानांसाठी तिकीट असलेल्या प्रवाशांनी पुढील माहितीकरिता थेट इंडिगो एअरलाइन्सशी संपर्क साधावा. पुन्हा बुकिंग, पर्यायी प्रवास किंवा परतफेड याबाबतची माहिती एअरलाइनच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर मिळू शकते. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा यासाठी पुणे विमानतळ प्रशासन एअरलाइनशी संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटची माहिती तपासण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 16, 2025 9:52 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
नववर्षाचा प्लॅन बदला! ‘इंडिगो’चा पुन्हा खोळंबा, पुण्यातून 'या' शहरांना जाणारी-येणारी विमाने रद्द!









