कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, गोवा, मध्य प्रदेशसह ‘या’ मार्गावर विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Konkan Railway: नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. गोवा, कर्नाटकसह मध्य प्रदेश मार्गावर विशेष ट्रेन धावणार आहेत.

konkan railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, गोवा, मध्य प्रदेशसह ‘या’ मार्गावर विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक
konkan railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, गोवा, मध्य प्रदेशसह ‘या’ मार्गावर विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक
मुंबई: नाताळ आणि नवीन वर्षाच्या कालावधीत रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटकमधून विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांचा उद्देश प्रवाशांची अतिरिक्त मागणी भागवणे आणि गर्दी कमी करणे हा आहे.
कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयाने मध्यप्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 09304 डॉ. आंबेडकर नगर ते ठोकूर विशेष गाडी 21 आणि 28 डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर नगर येथून दुपारी 4:30 वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री 3:00 वाजता ठोकूर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 09304 ठोकूर ते डॉ. आंबेडकर नगर विशेष गाडी 23 आणि 30 डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे 4:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30 वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.
advertisement
याशिवाय कोकण रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने छत्तीसगडच्या बिलासपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान विशेष गाडी चालवली जाईल. गाडी क्रमांक 08241 बिलासपूर ते मडगाव एक्स्प्रेस 20 आणि 27 डिसेंबर तसेच 3 आणि 10 जानेवारी रोजी दुपारी 2:45 वाजता बिलासपूरहून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री 2:15 वाजता मडगाव येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 08242 मडगाव जंक्शन ते बिलासपूर एक्स्प्रेस 22 आणि 29 डिसेंबर तसेच 5 आणि 12 जानेवारी रोजी मडगाव जंक्शनहून पहाटे 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.
advertisement
या विशेष गाड्यांसाठी प्रवाशांकडून विशेष भाडे आकारणी केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना आवडीनुसार स्थानिक सोयीस्कर मार्गे अधिक आरामदायक आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. अशा विशेष रेल्वेगाड्यांमुळे यात्रेकरूंना नववर्षाच्या सणाच्या काळात अधिक सुलभतेने प्रवास करता येईल आणि गर्दी कमी होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, गोवा, मध्य प्रदेशसह ‘या’ मार्गावर विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आली अपडेट
ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आ
  • ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आ

  • ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आ

  • ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आ

View All
advertisement