advertisement

दो दुश्मन बन बैठे यार? 'बिग बॉस'च्या घरात बनली जोडी! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात टोळी पाहत आलात, आता मात्र जोडी दिसणार आहे.

News18
News18
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनचा तीन आठवडे संपले आहेत. 3 आठवड्यांत एकूण 17 पैकी दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. आता एकूण 15 सदस्य उरले आहेत आणि चौथा आठवडा. आता चौथ्या आठवड्यात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात टोळी पाहत आलात, आता मात्र जोडी दिसणार आहे... हो बरोबर वाचलंत. बिग बॉसच्या घरात आता जोड्या बनल्या आहेत.
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात बिग बॉस सांगतात, "गेले तीन आठवडे सर्वांना कसलंच बंधन नव्हतं. पण आता बिग बॉस तुम्हाला या क्षणापासून जोड्यांमध्ये अडकवत आहे." यानंतर प्रोमोमध्ये बेडीमध्ये अडकलेल्या वेगवेगळ्या जोड्या दिसतात.
advertisement
राकेश बापट आणि अनुश्री माने, तन्वी कोलते आणि रुचिता जामदार प्राजक्ता शुक्रे आणि रोशन भजनकर, सागर कारंडे आणि प्रभू शेळके, विशाल कोटियन आणि ओमकार राऊत, दिपाली सय्यद आणि दिव्या शिंदे अशा इतर जोड्या आहेत. घरात एकूण 15 सदस्य असल्याने एकूण 6 जोड्या आणि एक त्रिकुट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सचिन कुमावत, आयुष संजीव, करण सोनावणे यांना बिग बॉसने त्रिकुटाच्या बेडीत अडकवलंय असं प्रोमोतून पाहायला मिळत आहे.
advertisement
एकंदर काय एकमेकांशी वाद घालणारे बिग बॉसच्या दोन घरातील शत्रूंना बिग बॉसने बेडीत अडकवलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या आधीच्या सीझनमध्ये हा हटके टास्क पाहायला मिळाला होता. 'बिग बॉस'ने अनपेक्षित जोड्या जुळवल्या होत्या. सतत भांडणाऱ्या स्पर्धकांना जोडीच्या बेडीत अडकवलं गेलं होतं. आता या सीझनमध्ये तेच पाहायला मिळणार आहे. बिग बॉसने टोळी फोडली आहे आणि सदस्यांच्या जोड्या बनवल्या आहेत.
advertisement
आता भांडणामुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेले राकेश बापट आणि अनुश्री माने यांची जोडी आहे. तसंच तन्वी कोलते आणि रुचिता जामदार ज्या दोघी आधी मैत्रिणी होत्या पण आता सतत एकमेकींशी वाद घालताना दिसतात. या दोघींचीही जोडी बनवण्यात आली आहे. इतर सदस्यांचंही तसंच आहे.
advertisement
advertisement
आता कायम एकमेकांच्या विरोधात जाणारे हे सदस्य जोडीच्या बेडीत अडकून एकत्र आल्यावर काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता खरी मजा येणार आहे, असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. बिग बॉसने जुळवलेल्या तुम्हाला या जोड्या कशा वाटल्या आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
दो दुश्मन बन बैठे यार? 'बिग बॉस'च्या घरात बनली जोडी! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट
Next Article
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
  • इराणचा सर्वात मोठा इशारा!

  • एका सेकंदात संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार?

  • जगाची डिजिटल लाइफलाईन कापून टाकणारा

View All
advertisement