advertisement

Weather Alert: फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच मोठं संकट, वादळी वारे वाहणार, धो धो बरसणार, महाराष्ट्रात यलो अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच मोठे बदल जाणवत आहेत. आज राज्यातील काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असून फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या हवामानात मोठे उलटफेर जाणवत आहेत. हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात ढगाळ वातावरण, पावसाची नोंद आणि वाऱ्याचा वेग वाढल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने आज, 2 फेब्रुवारी 2026 रोजी, राज्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आजचे हवामान कसे असणार आहे, ते पाहूया.

2/5
कोकण किनारपट्टीवर आज ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये सकाळच्या वेळेत थंडी जाणवेल, मात्र दुपारनंतर उकाडा वाढलेला दिसेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात हलक्या सरी पडणार आहेत.आज कोकणात कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस राहणार आहे.
कोकण किनारपट्टीवर आज ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये सकाळच्या वेळेत थंडी जाणवेल, मात्र दुपारनंतर उकाडा वाढलेला दिसेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात हलक्या सरी पडणार आहेत.आज कोकणात कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस राहणार आहे.आज कोकणात कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस राहणार आहे.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर परिसरात हवामानात बदल जाणवणार असून काही भागांमध्ये हलका पाऊस पडणार आहे. सकाळ आणि रात्री थंडीचा प्रभाव राहील, तर दिवसा वातावरण उबदार राहणार आहे. या भागांमध्ये आज कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअस इतके राहील.

4/5
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आज हवामानात मोठे बदल जाणवतील. धुळे, जळगाव, नाशिक घाट आणि नाशिक परिसरात कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस पडणार असून 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार आहे. यासोबतच नंदुरबार, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि अहिल्यानगर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या भागांमध्ये आज कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस राहणार आहे.

5/5
एकंदरीत पाहता, 2 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होणार आहे. पुढील काही दिवसांतही हवामानात असेच बदल कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले असून नागरिकांनी वादळी वाऱ्यांपासून आणि पावसापासून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement