पहिल्यांदा कार खरेदी करताय? न्यू ड्रायव्हर्ससाठी बेस्ट आहेत या 5 दणकट कार, सेफ्टीही भारी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Best Cars for Beginners: तुम्ही नवी कार खरेदी करताय आणि तुम्हाला सेफ्टी महत्त्वाची वाटत असेल तर आज आपण काही खास ऑप्शन पाहणार आहोत. जे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. या कार नव्याने कार चालवणाऱ्यांसाठी बेस्ट ठरतात. कारण यात सेफ्टी फीचर्स भारी आहेत. एवढंच नाही तर या सर्व कार दणकट आहेत.
advertisement
मॅग्नाइटमध्ये 360-डिग्री कॅमेराची सुविधा मिळते. ज्यामुळे कमी अनुभवी ड्रायव्हर्सला अडचणीच्या ठिकाणी गाडी पार्क करण्यात मदत मिळते. यासोबतच यात ट्रॅक्शन कंट्रोल आणि हायड्रोलिक ब्रेक असिस्टसारखे फीचर्स आहेत. जे ओल्या आणि निसरड्या रस्त्यांवर चाकांची पकड मजबूत करते. ज्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 5.62 लाख रुपये आहे.
advertisement
advertisement
स्विफ्टमध्ये ABS, EBD आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) सारखे फीचर्स मिळतात. ज्यामुळे अचानक ब्रेक लागल्यावर गाडी घसरत नाही. या कारचा मेंटेनेंस खर्च कमी आहे आणि मायलेज चांगलं आहे. ज्यामुळे ती पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या लोकांचे पॉकेट आणि सेफ्टी दोन्हीसाठी एक व्यावहारिक आणि परवडणारा ऑप्शन ठरते. ही कार फक्त 5.79 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता.
advertisement
advertisement
एक्सटरमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हीकल स्टेबिलिटी मॅनेटमेंच सारखे फीचर्स दिले गेलेय. या टेक्नॉलॉजीमुळे गाडी उतारावरुन घसरत नाही आणि अचानक वळन आल्यावर कंट्रोलमध्ये राहते. टीन-एजर्ससाठी याची सोपी ड्रायव्हलिबिलिटी आणि टेक-लोडेड इंटीरियर खुप आकर्षक ठरते. ही कार 5.80 लाख रुपयांच्या एक्स-शोरुम किंमतीवर खरेदी केली जाऊ शकते.
advertisement
Renault Kwid: ही कार अशा लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. ज्यांना लहान आणि स्टायलिश कारपासून सुरूवात करायची आहे. यात ड्रायव्हर साइड एयरबॅग, एबीएससह EBD आणि रियर पार्किंग सेन्सर्ससारखे बेसिक मात्र आवश्यक सेफ्टी फीचर्स दिलेय. या कारचे कॉम्पॅक्ट साइज शहरातील ट्रॅफिकमध्ये ती चांगल्या प्रकारे हातळण्यास मदत करते.
advertisement
क्विडची हाय ग्राउंड क्लीयरेन्समुळे ती खराब आणि खालीवर असणाऱ्या रस्त्यांवर सुरक्षित राहते. मात्र या कारची सेफ्टी रेटिंग इतर कारच्या तुलनेत थोडी कमी आहे. पण याच्या लेटेस्ट अपडेटेड मॉडल्समध्ये स्ट्रक्चरल मजबुती आणि सेफ्टी किट चांगली ठेवण्याचा प्रयत्न केलाय. कमी वयाच्या लोकांसाठी ही एक सोपी आणि लर्निंग कार आहे. या कारची किंमत 4.30 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
Tata Punch: टाटा पंच ही पहिल्यांदाच गाडी चालवणाऱ्या तरुणांसाठी एक बेस्ट ऑप्शन ठरते. या कारला Global NCAP आणि Bharat NCAP दोन्हीमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या कारचे मजबूत 'ALFA-ARC' प्लॅटफॉर्म आणि हाय-स्ट्रेंथ स्टील बॉडी टीन एजरला रस्त्यावर अतिरिक्त आत्मविश्वास आणि सुरक्षा देते. ज्यामुळे ती नवीन ड्रायव्हर्ससाठी खुप उपयुक्त ठरते.
advertisement
सुरक्षेच्या हिशोबाने पंचमध्ये 6 एयरबॅग्स, ABS सह EBD आणि ब्रेक स्वे कंट्रोलसारखे मॉडर्न फीचर्स स्टँडर्ड मिळतात. याची उंची सीटिंग पोझिशन ड्रायव्हर्सला रस्ता स्पष्ट दाखवते. ज्यामुळे गर्दीच्या भागांमध्ये गाडी चालवणे सोपं होतं. ही गाडी लहान असुनही एक दमदार एसयूव्ही असल्याची जाणीव करून देते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.59 लाख रुपये आहे.








