advertisement

Beed : नवऱ्याने नवा मोबाईल घेऊन दिला नाही, बीडच्या महिलेची साडेतीन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी

Last Updated:

पतीने नवीन मोबाईल फोन घेण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या 24 वर्षीय महिलेने तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं आहे.

नवऱ्याने नवा मोबाईल घेऊन दिला नाही, बीडच्या महिलेची साडेतीन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी (AI Image)
नवऱ्याने नवा मोबाईल घेऊन दिला नाही, बीडच्या महिलेची साडेतीन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी (AI Image)
बीड : पतीने नवीन मोबाईल फोन घेण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या 24 वर्षीय महिलेने तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं आहे. बीड तालुक्यातील लिंबारुई परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
मृत महिलेचे नाव प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय 24) असे आहे. वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता तिचा पती रामेश्वर बाबासाहेब दराडे याच्याकडून नवीन मोबाईल फोनची मागणी करत होती. प्राजक्ताच्या पतीने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आणि संतापून प्राजक्ताने तिच्या साडेतीन वर्षांचा मुलगा वेदांतसह शेतातील विहिरीत उडी मारली.
advertisement
ही घटना 31 डिसेंबर 2025 रोजी घडली. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यू (एडीआर) म्हणून त्याची नोंद केली होती. पण, सखोल चौकशी आणि पतीच्या जबाबानंतर धक्कादायक सत्य समोर आले. 31 जानेवारी 2026 रोजी याप्रकरणी सविस्तर एफआयआर दाखल करण्यात आला. मृत प्राजक्ता हिच्याविरुद्ध निष्पाप मुलगा वेदांतला बुडवून मारल्याबद्दल हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
मोबाईल फोनमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे गावातल्या लोकांना धक्का बसला आहे. वाढता मानसिक ताण आणि क्षुल्लक गोष्टींवरून येणारा अनियंत्रित राग यामुळे अशा घटना वाढत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed : नवऱ्याने नवा मोबाईल घेऊन दिला नाही, बीडच्या महिलेची साडेतीन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement