Pune Crime : पुण्यात प्लॅन आखला, कोल्हापुरात सापळा रचून उचललं! निवडणूक जाहीर होताच बंडू आंदेकरच्या खास माणसाला अटक
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime Gang War : पुणे पोलिसांना गुप्त सूत्रांकडून गणेश वड्डा हा सध्या कोल्हापूर येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती.
Pune Crime News (अभिजीत पोटे, प्रतिनिधी) : पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी करत 22 लाख रुपयांची रोकड आणि एक बंदूक जप्त केली गेली होती. अशातच आता पुणे पोलिसांच्या हाती मोठं यश लागलं असून, गेल्या दोन वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आणि शहरातील कुख्यात आंदेकर टोळीचा सदस्य गणेश ऊर्फ सूरज अशोक वड्डा याला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड परिसरातून अटक करण्यात आली आहे.
पथकाने तातडीने कोल्हापूर गाठलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांना गुप्त सूत्रांकडून गणेश वड्डा हा सध्या कोल्हापूर येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पुणे पोलिसांच्या पथकाने तातडीने कोल्हापूर गाठलं आणि अत्यंत शिताफीने कोल्हापूरमधील भुदरगड येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
घातक शस्त्रसाठा जप्त
advertisement
या कारवाईदरम्यान, आंदेकर टोळीशी संपर्कात असलेल्या एका अल्पवयीन तरुणाची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल (देशी कट्टा), एक लोखंडी धारदार कुकरी आणि काळचा रंगाचे एअर पिस्तूल असा घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे.
आरोपी गणेश वड्डाला अटक
advertisement
फरार आरोपी गणेश वड्डा याच्या अटकेमुळे आणि अल्पवयीन मुलाकडून शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे आंदेकर टोळीच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे. दोन वर्षांपासून तो बेपत्ता होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि या टोळीच्या पुणे आणि कोल्हापूरमधील कनेक्शनची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आंदेकर टोळीमधून निवडणूक कोण लढवणार?
advertisement
दरम्यान, आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरूंगात असलेलं आंदेकर कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अशातच पुणे पोलिसांनी आणखी फास आवळ केला असून आंदेकरांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात प्लॅन आखला, कोल्हापुरात सापळा रचून उचललं! निवडणूक जाहीर होताच बंडू आंदेकरच्या खास माणसाला अटक











