शनि-सूर्याची युती! 4 जानेवारीपासून 3 राशींकडे श्रीमंती येण्यास सुरू होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला नवग्रहांचा अधिपती मानले जाते. आत्मबल, नेतृत्व, कीर्ती, अधिकार आणि प्रतिष्ठेचा कारक असलेला सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला नवग्रहांचा अधिपती मानले जाते. आत्मबल, नेतृत्व, कीर्ती, अधिकार आणि प्रतिष्ठेचा कारक असलेला सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करतो. कुंडलीत सूर्य बलवान आणि शुभ स्थितीत असेल, तर व्यक्तीच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढतो, कामात यश मिळते आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. दुसरीकडे, शनी ग्रहाला कर्माचा न्यायाधीश मानले जाते. शनी आपल्या कर्मांनुसार फळ देतो, त्यामुळे त्याच्या संयोगांना विशेष महत्त्व असते. 2026 वर्षाच्या सुरुवातीलाच शनी आणि सूर्य यांचा विशेष ‘पंचांक योग’ तयार होणार असून, या ग्रहस्थितीचा काही राशींवर अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
advertisement
पंचांगानुसार, 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजून 38 मिनिटांनी सूर्य आणि शनी एकमेकांपासून 72 अंशांच्या अंतरावर असतील. या विशिष्ट कोनात्मक स्थितीमुळे ‘पंचांक योग’ निर्माण होतो. या काळात शनी ग्रह मीन राशीत भ्रमण करत असेल, तर सूर्य धनु राशीत स्थित असेल. ग्रहांची ही युती काही राशींसाठी प्रगती, धनलाभ, स्थैर्य आणि मानसिक समाधान घेऊन येणारी ठरणार आहे. विशेषतः तीन राशींना या योगाचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
धनु रास - धनु राशीच्या जातकांसाठी सूर्य-शनीचा पंचांक योग भाग्यवर्धक ठरेल. या काळात रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा आणि अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवे दरवाजे उघडू शकतात, तर व्यवसाय करणाऱ्यांना नफा वाढण्याचे संकेत मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भविष्यासाठी नियोजन करता येईल. मान-सन्मानात वाढ होईल, तसेच वरिष्ठांची प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि आई-वडील तसेच गुरूजनांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. मनात असलेल्या काही महत्त्वाच्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात.
advertisement
मकर रास - मकर राशीसाठी सूर्य आणि शनी यांची युती अनुकूल फलदायी ठरणार आहे. प्रत्येक कामात आत्मविश्वासाने पुढे जाता येईल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन उद्योग, प्रकल्प किंवा जबाबदारी स्वीकारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल आणि नात्यांमध्ये स्थैर्य येईल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते, तर कार्यरत लोकांना पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याचे संकेत आहेत. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि गुरूंचा आशीर्वाद आत्मविश्वास वाढवेल.
advertisement
मीन रास - मीन राशीच्या व्यक्तींना हा पंचांक योग विशेष लाभदायी ठरेल. दीर्घकाळापासून चालू असलेल्या अडचणी आणि मानसिक ताणतणावातून दिलासा मिळेल. आरोग्य आणि मन:शांती सुधारेल. आर्थिक बाजू भक्कम होईल आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, त्यामुळे कामे सोपी होतील. कुटुंबातून, विशेषतः मुलांकडून आनंददायी बातमी मिळू शकते. शत्रूंवर मात करण्याची क्षमता वाढेल आणि केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
advertisement
advertisement










