T20 World Cup : 240 बॉल पाहिलेत, पण फक्त 2 बॉलनी इंग्लंडचा घात केला, काही कळायच्या आत मॅच फिरली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या हायव्होल्टेज सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 रननी थरारक विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 254 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 246/7 पर्यंत मजल मारली.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या हायव्होल्टेज सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 रननी थरारक विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 254 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 246/7 पर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जेकब बेथलने 48 बॉलमध्ये 218.75 च्या स्ट्राईक रेटने 105 रन केले. बेथलने त्याच्या या वादळी खेळीमध्ये 7 सिक्स आणि 8 फोर मारल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 2 विकेट घेतल्या, तर अर्शदीप, बुमराह, वरुण आणि अक्षर पटेल यांनी 1-1 विकेट घेतली.
शेवटच्या ओव्हरपर्यंत थरारक झालेल्या या सामन्यात दोन क्षण असे आले जे टीम इंडियाच्या विजयाचे टर्निंग पॉईंट ठरले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने फिल्डिंगमध्ये धमाका केला. अक्षरने आधी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा 25 मीटर उलटा धावत जाऊन कॅच पकडला. जसप्रीत बुमराहने टाकलेल्या स्लो बॉलवर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा अंदाज चुकला आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला, तेव्हा अक्षर पटेलने मागे धावत जाऊन उत्कृष्ट कॅच घेतला.
advertisement
Axar Patel! How have you done that?
The catch may go down as Shivam Dube's but Bapu's brilliance made it all happen!
ICC Men’s #T20WorldCup | Semi-final 2 | #INDvENG | LIVE NOW https://t.co/L2OuYBUDbL pic.twitter.com/jwwtzjMFxT
— Star Sports (@StarSportsIndia) March 5, 2026
advertisement
यानंतर अर्शदीप सिंगच्या 14 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विल जॅक्सने बाऊंड्रीच्या दिशेने बॉल मारला, तेव्हा अक्षर पटेल धावत आला आणि त्याने कॅच पकडला, पण आपण बाऊंड्री लाईनच्या बाहेर जात असल्याचं अक्षरला समजलं, त्यानंतर अक्षरने क्षणाचाही विलंब न लावता बॉल बाजूलाच असलेल्या शिवम दुबेच्या बाजून फेकला आणि दुबेनेही बॉल पकडला ज्यामुळे विल जॅक्सची विकेट गेली. विल जॅक्सने 20 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली.
advertisement
अक्षर पटेलने दोन वेळा मोक्याच्या क्षणी केलेल्या या फिल्डिंगमुळे अडचणीत सापडलेली टीम इंडिया बाहेर आली. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही मॅचच्या निर्णायक टप्प्यावर जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला आणि बुमराहनेही कॅप्टनला निराश केलं नाही. आपल्या पहिल्याच बॉलला बुमराहने धोकादायक हॅरी ब्रुकची विकेट घेतली.
"Bapu tari fielding kamal che!"
Out of words for that sensational catch by Axar Patel to end Harry Brook’s stay at the crease!
Catch of the tournament?
ICC Men’s #T20WorldCup | Semi-final 2 | #INDvENG | LIVE NOW https://t.co/L2OuYBUDbL pic.twitter.com/qFwnou3pCo
— Star Sports (@StarSportsIndia) March 5, 2026
advertisement
टीम इंडियाचा मोठा स्कोअर
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 253 रनपर्यंत मजल मारली. संजू सॅमसनने 42 बॉलमध्ये 211.90 च्या स्ट्राईक रेटने 89 रन केले, ज्यात 7 सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता. याशिवाय शिवम दुबेने 25 बॉल 43, इशान किशनने 18 बॉल 39 रन केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 11:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 240 बॉल पाहिलेत, पण फक्त 2 बॉलनी इंग्लंडचा घात केला, काही कळायच्या आत मॅच फिरली!







