Baby Girl Names: मराठीत देवी लक्ष्मीवरून ठेवावी अशी मुलींची खास नावे; अर्थपूर्ण आणि मॉडर्न टच
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Baby Girl Names List Marathi: आपल्या बाळाचं नाव छान आणि हटके असावं, असं अनेकांना वाटतं. मुलीचं नाव ठेवणं हा प्रत्येक आई-बाबांसाठी खूप शोधशोध करावी लागते. नाव काय ठेवावं यावर भरपूर चर्चा होतात. जर तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीसाठी एखादं संस्कृत, पौराणिक, पारंपारिक चांगल्या अर्थाचं नाव शोधत असाल, तर लक्ष्मी देवीची काही नावं यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. लक्ष्मी देवी धन आणि सुख-समृद्धीची देवता आहे, तिच्या नावावरून ठेवलेली नावं सकारात्मक उर्जा वाढवणारी असतात.
मुलीला देवी लक्ष्मीच्या नावानं हाक मारल्यानं तिच्यामध्ये दया, सौम्यता, करुणा आणि सौभाग्यासारखे गुण येतात, असे मानले जाते. अशी नावं घरात सकारात्मक वातावरण टिकवून ठेवतात, सुखी घरात पैसा म्हणजे लक्ष्मी आपोआप येतेच. मुलीसाठी पारंपारिक आणि अर्थपूर्ण नाव शोधत असाल, तर लक्ष्मी देवीची खालील काही नावं तुम्हाला नक्कीच आवडतील.
advertisement
उर्वी - पृथ्वीला सुद्धा उर्वी या नावानं ओळखलं जातं. लक्ष्मी देवीला सुद्धा उर्वी म्हटलं जातं.त्रिशिखा - त्रिशिखा या नावाचा संबंध लक्ष्मी देवीशी मानला जातो. याचा अर्थ त्रिशूळ किंवा तीन शिखा असा होतो.अदित्री - लक्ष्मी देवीला अदित्री या नावानं सुद्धा ओळखलं जातं. अदित्री या नावाचा अर्थ सर्वोच्च सन्मान किंवा विद्वान असा होतो. तुम्ही तुमच्या मुलीसाठी हे गोंडस नाव देऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement






