MHADA Lottery : म्हाडाचा मोठा धमाका! मुंबईसह 'या' शहरातील प्राईम लोकेशनवर मिळवा घर; जाणून घ्या सविस्तर
Last Updated:
MHADA Lottery 2026 : म्हाडा कोकण बोर्ड 2026 मध्ये घरांची नवीन लॉटरी जाहीर करणार आहे. मागील लॉटरीमध्ये घर न मिळालेल्या नागरिकांना पुन्हा संधी मिळणार आहे.
मुंबई : कोकण मंडळाच्या म्हाडा लॉटरीत गेल्या वेळी ज्यांना घर मिळाले नव्हेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. म्हाडा कोकण मंडळ 2026 च्या पहिल्या महिन्यात घरांच्या नवीन जाहिराती जारी करण्याच्या तयारीत आहे. मागील लॉटरीत विजेतेपद मिळवू न शकलेल्या आणि घराची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी हरवलेल्या व्यक्तींना आता पुन्हा एक संधी मिळणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह 'या' शहरांत घराची संधी
म्हाडा एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यांनुसार मागील लॉटरीमध्ये न विकलेल्या घरांसह इतर उपलब्ध घरांची माहिती सध्या एकत्रित केली जात आहे. जानेवारीत घरांच्या लॉटरीसाठी जाहिरात प्रकाशित केली जाईल. लक्षात ठेवा कोकण बोर्डची अंतिम लॉटरी मागील सप्टेंबरमध्ये पार पडली होती, ज्यात 5,354 घरांसाठी 1.58 लाखाहून अधिक लोकांनी अर्ज केला होता.
advertisement
घराचे लोकेशन काय?
या लॉटरीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड आणि इतर परिसरातील घरांचा समावेश होता. दीड लाखाहून अधिक अर्ज हे स्पष्ट करतात की म्हाडा घरांबद्दल लोकांची आवड आणि गरज वाढत आहे. मुंबई-महाराष्ट्रातील प्रॉपर्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे म्हाडाचे किफायतशीर घर लोकांसाठी अधिक आकर्षक ठरत आहेत.
म्हाडा घरांची किंमत बाजारभावापेक्षा 25 ते 40 टक्के कमी असते, ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी स्वप्नातील घर मिळवणे सोपे होते. लॉटरीमध्ये सहभागी होणाऱ्यांना योग्य संधी मिळून त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 10:05 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery : म्हाडाचा मोठा धमाका! मुंबईसह 'या' शहरातील प्राईम लोकेशनवर मिळवा घर; जाणून घ्या सविस्तर









