advertisement

पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅममधून सुटका! महात्मा फुले चौकात उभारला जाणार 121 कोटींचा आलिशान उड्डाणपूल; पाहा कसा असेल प्लॅन?

Last Updated:

मुंढवा, केशवनगर आणि खराडी परिसरातील रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची लवकरच मुक्तता होणार आहे. मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास मार्गावरील उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे.

महात्मा फुले चौकात उभारला जाणार 121 कोटींचा आलिशान उड्डाणपूल (प्रतिकात्मक फोटो)
महात्मा फुले चौकात उभारला जाणार 121 कोटींचा आलिशान उड्डाणपूल (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: मुंढवा, केशवनगर आणि खराडी परिसरातील रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची लवकरच मुक्तता होणार आहे. मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास मार्गावरील उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. महात्मा फुले चौक येथे भव्य उड्डाणपूल उभारण्याच्या १२० कोटी ११ लाख रुपयांच्या प्रस्तावास पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे मगरपट्टा ते खराडी या पट्ट्यातील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे.
मेट्रो आणि पूल एकाच मार्गावर
विशेष म्हणजे, हा उड्डाणपूल दुमजली स्वरूपाचा असणार आहे. खालच्या स्तरावरून वाहनांची ये-जा सुरू राहील, तर उड्डाणपुलाच्या वरून मेट्रोची लाइन प्रस्तावित आहे. मेट्रो प्रशासनाशी समन्वय साधून हे गुंतागुंतीचे काम पूर्ण केले जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे परिसरातील दळणवळण अधिक वेगवान होईल.
advertisement
पुलाचे वैशिष्ट्ये आणि स्वरूप:
एकूण लांबी: १ हजार ८० मीटर (मुख्य पूल ७९६ मीटर).
रुंदी: १६ मीटर असून वाहतुकीसाठी स्वतंत्र दुहेरी मार्गिका असतील.
खांब : एकूण ३६ खांब उभारले जातील, त्यापैकी ८ खांब नदीपात्रात असतील.
कालावधी: पावसाळा वगळता २४ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
advertisement
या प्रकल्पामध्ये पुलाच्या संरचनेत आधुनिक बदल आणि जीएसटी धोरणानुसार तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅममधून सुटका! महात्मा फुले चौकात उभारला जाणार 121 कोटींचा आलिशान उड्डाणपूल; पाहा कसा असेल प्लॅन?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement