पुणे-नगर मार्गावर या वाहनांना पुढील 5 दिवस बंदी, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमुळे निर्णय
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. १८ ते २२ मार्च या कालावधीत लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरात रंगणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून लाखो कुस्तीप्रेमी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. १८ ते २२ मार्च या कालावधीत लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
वाहतुकीचे नवीन नियम
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्चपासून २२ मार्चपर्यंत दररोज दुपारी दोन ते रात्री अकरा या वेळेत ही बंदी लागू राहील. यामध्ये ट्रक, खासगी आराम बस, जेसीबी, रोडरोलर आणि ट्रॅक्टर यांसारख्या सर्व अवजड वाहनांचा समावेश आहे. केवळ मुख्य रस्त्यावरच नाही, तर या परिसरातील उपरस्त्यांवरही अवजड वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
advertisement
महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा असल्याने प्रचंड गर्दी होण्याचा अंदाज आहे. लोणीकंद ते खराडी या पट्ट्यात वाहतूक सुरळीत राहावी आणि कुस्तीप्रेमींना वेळेत पोहचता यावे, यासाठी हे विशेष नियोजन करण्यात आले आहे. अवजड वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर तुम्ही या मार्गावरून प्रवास करणार असाल, तर वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 11:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-नगर मार्गावर या वाहनांना पुढील 5 दिवस बंदी, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमुळे निर्णय







