पिंपरी-चिंचवड आरटीओची नवी 'MZ' सीरिज! चारचाकीसाठी आवडीचा नंबर हवाय? असा करा अर्ज
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
ज्या वाहनधारकांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक हवा आहे, त्यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत मोशी येथील आरटीओ कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
पिंपरी-चिंचवड: आपल्या नवीन कारसाठी 'फॅन्सी' किंवा पसंतीचा नंबर शोधणाऱ्या वाहनधारकांसाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) नवीन 'MZ' मालिका सुरू करण्याची घोषणा केली आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांकांच्या आरक्षणासाठीची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 18 डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहे.
अर्ज कुठे आणि कधी करायचा?
ज्या वाहनधारकांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक हवा आहे, त्यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत मोशी येथील आरटीओ कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहित शुल्क भरणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे:
पत्त्याचा पुरावा (Address Proof)
आधार कार्ड (Aadhaar Card)
advertisement
ओळखपत्र (Identity Proof)
पॅन कार्ड (PAN Card)
बुकिंग शुल्कासाठीचा डिमांड ड्राफ्ट हा कोणत्याही राष्ट्रीयीकृत किंवा शेड्यूल्ड बँकेचा असावा. हा डीडी "Deputy RTO, Pimpri-Chinchwad" यांच्या नावाने असावा आणि तो पुणे येथे देय असणे आवश्यक आहे. पत्त्याची पडताळणी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ नुसार कडकपणे केली जाणार आहे.
लिलाव आणि बोली प्रक्रिया: १९ डिसेंबर २०२५: उपलब्ध असलेल्या 'MZ' मालिकेतील क्रमांकांची यादी आरटीओच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.
advertisement
बोली लावणे: जर एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले, तर इच्छुक अर्जदारांना जादा रकमेचा डीडी सीलबंद पाकिटात १९ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजेपर्यंत जमा करावा लागेल.
निकाल: ही पाकिटे त्याच दिवशी (१९ डिसेंबर) दुपारी ३:३० वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडली जातील. सर्वाधिक बोली लावणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक दिला जाईल.
advertisement
लिलाव प्रक्रियेनंतर जे क्रमांक शिल्लक राहतील, ते सर्व वाहनधारकांसाठी ऑनलाइन बुकिंगसाठी उपलब्ध करून दिले जातील.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 18, 2025 10:54 AM IST










