Mumbai Local : कल्याण-ठाणे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास होणार अधिक वेगवान,मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
Last Updated:
Kalyan To Thane : ठाणे ते कल्याण दरम्यान ७वा आणि ८वा रेल्वे मार्ग तयार केल्यास प्रवाशांना वेळ वाचेल, वाहतूक अधिक सुरळीत होईल. दिवा, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरील गर्दी कमी होईल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील.
ठाणे- कल्याण किंवा कल्याण-ठाणे असा दररोजचा लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.आता हा मार्गाचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे शिवाय मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यात प्रवशांना नेमका कसा फायदा होईल ते सविस्तर जाणून घेऊयात.
कल्याण-ठाणे लोकल प्रवास होणार झपाट्याने
ठाणे ते कल्याण हा सुमारे 10.8 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग मुंबईच्या मध्य रेल्वेवर सर्वाधिक गाड्या धावणारा मार्ग आहे. दररोज या मार्गावर सुमारे 1,000 गाड्या धावतात आणि ठाणे, दिवा आणि कल्याण ही स्थानके दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची इंटरचेंज पॉइंट म्हणून काम करतात.
नवीन मार्ग उपलब्ध होणार
वाहतुकीत गती वाढवण्यासाठी आणि प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे ठाणे ते कल्याण दरम्यान 7वा आणि 8वा रेल्वे मार्ग तयार करण्याचा विचार करत आहे. या प्रकल्पात डोंबिवली येथे भूमिगत मार्ग तयार होण्याची शक्यता आहे ज्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल.
advertisement
सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेने स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली आहे. या एजन्सीने ट्रॅकचे अचूक स्थान, पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी कामांसाठी तपशीलवार योजना आणि रेखाचित्रे तयार केली आहेत. नवीन मार्गासाठी अंतिम संरेखन यावर आधारित ठरवले जाईल.
दिवा स्थानक हे सर्वात गर्दीचे असून, येथे दररोज धावणाऱ्या ८९४ गाड्यांपैकी ७०-७५% गाड्या थांबतात. यामुळे लेव्हल क्रॉसिंग दिवसातून सरासरी ३९ वेळा उघडले जाते, ज्यामुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.
advertisement
भविष्यात ७वा आणि ८वा मार्ग तयार झाल्यास लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्रत्येकी चार मार्ग उपलब्ध होतील. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी काही वर्षे लागणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Mumbai Local : कल्याण-ठाणे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास होणार अधिक वेगवान,मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय










