advertisement

गर्लफ्रेंडच्या कुटुंबाकडून मानसिक छळ, मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Last Updated:

मुंबई पोलीस दलात भैय्यासाहेब व्हावळे यांची ७ फेब्रुवारी २०२६ ला मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती.

मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मुलीच्या वडिलांचा दबाव असल्याचे सांगून मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून मुंबईतल्या कलिना पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस कर्मचाऱ्याने आपले जीवन संपविल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस शिपाई भैय्यासाहेब व्हावळे (वय ३२ वर्ष) यांची ७ फेब्रुवारी २०२६ साली मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते मूळचे परभणीचे रहिवासी होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली नोट समोर आली असून त्यांनी प्रेयसीच्या कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत.

तू जीव दे नाहीतर तुझी नोकरी घालवणार, मुलीच्या कुटुंबाकडून सातत्याने धमकी

advertisement
प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आपण टोकाचे पाऊल उचलत आहोत असे सांगत प्रेसयीचे वडील सातत्याने धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. तू जीव दे नाहीतर तुझी नोकरी घालवणार, अशी धमकी त्यांना दिली होती, असे नोटमध्ये भैय्यासाहेब व्हावळे यांनी लिहिले आहे.

नांदेडच्या हदगावमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध पण मुलीच्या घरच्यांचा विरोध

advertisement
पोलीस शिपाई भैय्यासाहेब व्हावळे यांनी त्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांची नावं लिहिली आहेत. नांदेडच्या हदगावमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. पण तरुणीच्या घरच्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध केला. त्यामुळे मुलीचे घरचे पोलीस भैय्यासाब व्हावळे यांना जीवे ठार मारण्याचे आणि पोलीस दलातून सस्पेंड करण्याची धमकी देत मानसिक छळ करत होते, त्यासोबत तू आत्महत्या कर नाहीतर तुझी नोकरी घालू अशी धमकी मुलीच्या कुटुंबियांकडून सातत्याने दिली जात होती, असे नोटमध्ये लिहिण्यात आले आहे.
advertisement

प्रेयसी आणि तिच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल

मुलीचे आई-वडिलांनी तिचे दुसरीकडे लग्न लावण्याचे ठरवले होते. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे नोटमध्ये लिहिले आहे. या प्रकरणी मृत भैय्यासाहेब व्हावळे यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील वाकोला पोलिसांनी भैय्यासाहेब यांची प्रेयसी आणि तिच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गर्लफ्रेंडच्या कुटुंबाकडून मानसिक छळ, मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement