कुठे साचलं पाणी तर कुठे गारपीट, पावसाने पुण्याला झोडपलं! PHOTOS
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट आल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने बुधवारसाठी राज्यातील 24 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार पुणे आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूरमध्ये एक तासभर जोरदार अवकाळी पावसाने बॅटिंग केली. यावेळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पुणे - सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत पाणी साचले. या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर कोल्हापूरमध्ये गारांसह पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली.
advertisement
advertisement
मराठवाड्यातील, परभणी, हिंगोली आणि लातूरमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांसोबतच आंबा, टोमॅटो आणि चिकू बागांनाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेली पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
advertisement








