'तू पैसे काढ, मी गाडीत पेट्रोल भरून येतो', पत्नीला बँकेत सोडलं, शेतकऱ्यासोबत भयंकर घडलं, सारं गाव हळहळलं!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur News: मुलीच्या लग्नाची बोलणी झाल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. अशातच बँकेत पैसे आणायला गेले आणि शेतकऱ्यावर काळाने झडप घातली.
सोलापूर: माणसाचा क्षणाचा भरवसा नाही, म्हटलं जातं, याचाच प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे बुधवारी आला. पत्नीला पैसे काढण्यासाठी बँकेत सोडून एक शेतकरी गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेले. तेवढ्यात काळानं गाठलं आणि 50 वर्षीय शेतकरी प्रकाश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ब्रह्मपुरी रोडवर बुधवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश मल्लेशा पाटील (वय 50) हे मुंढेवाडी येथील शेतकरी पत्नीसोबत ब्रह्मपुरी येथील बँकेमधून पैसे काढण्यासाठी आले होते. पत्नीला बँकेत सोडून ते आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी निघाले. तेव्हा मंगळवेढा - ब्रह्मपुरी रोडवर आंध्र प्रदेश राज्यातील पासिंग असलेल्या कारने प्रकाश यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की कारने प्रकाश यांना दुचाकीसह 100 मीटरपर्यंत फरफतट नेले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
कार चालक थेट पोलिसांत
अपघातानंतर कार मधील पती - पत्नी मारहाणीच्या भीतीने थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि अपघाताची संपूर्ण माहिती सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्या सीसीटीव्हीमध्ये अपघाताची भीषणता स्पष्ट दिसून आली. या अपघाताची माहिती मिळताच गावातील शेकडो तरुण व गावकरी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते.
advertisement
स्वप्न अधुरंच राहिलं
view commentsअपघातात मृत झालेले शेतकरी प्रकाश पाटील यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. दोन ते तीन दिवसांपूर्वीच एक स्थळ पाहण्यासाठी येऊन गेले होते. प्राथमिक बोलणी झाल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. काही दिवसांमध्ये लग्नाची तारीख घेण्यासाठी बैठकी होणार होती. पण या घडलेल्या अपघाताने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
December 18, 2025 10:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
'तू पैसे काढ, मी गाडीत पेट्रोल भरून येतो', पत्नीला बँकेत सोडलं, शेतकऱ्यासोबत भयंकर घडलं, सारं गाव हळहळलं!










